शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फणस लागवडीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 1, 2015 00:17 IST

फणसापासूनच्या पदार्थांना मागणी : व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज

बाळकृष्ण सातार्डेकर - रेडी  सध्या ग्रामीण भागातील आंबा आणि काजू या पिकांना वाढती मागणी असल्याने या हंगामी पिकांकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. मात्र, याचवेळी कोकणचे वैशिष्ट्य असणाऱ्या फणस लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे. आंबा, काजू यांच्याबरोबरच फणसापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांना स्थानिक बाजारपेठेत मागणी असल्याने फणसाची व्यावसायिक दृष्टीने लागवड करण्याची गरज आहे. कोकणात कापा आणि बरका (रसाळ) अशा फणसाच्या दोन प्रजाती आढळतात. कापा जातीच्या फणसाचे गरे खुसखुशीत असतात. या फणसाच्या गऱ्यांचा उपयोग प्राधान्याने खाण्यासाठी आणि भाजीसाठी केला जातो. तर बरका जातीच्या फणसाचे गरे मऊ, गोड, बुळबुळीत असल्याने या गऱ्यांचा उपयोग खाण्याबरोबरच इतर विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. परंतु, आर्थिक उत्पन्न देऊ शकणाऱ्या फणसाची व्यापारी आणि व्यावसायिक तत्त्वावर अजूनही लागवड होत नाही. सध्या मिळणारे उत्पन्न जुन्या आणि नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या फणसांपासून मिळते. कोकण परिसरात पावसाळी दिवसांत फणसांच्या बीची तिखट आमटी, तसेच बियाही उकडून खाल्या जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी तर महिलांच्या वाणामध्ये फणसाला मोठे महत्त्व असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वटपौर्णिमेच्या अगोदर फणसांचे शेकडो ट्रक मुंबई, पुणे येथे रवाना होतात. या सर्व उत्पन्नांमुळे स्थानिकांना हंगामी रोजगार प्राप्त होतो. बाजारभावाचा विचार करता, कापा फणस ७० ते १५० रुपये, बरका फणस ७० ते १२० रुपयांना मिळतो. तर सुटे गरेही प्रती डझन दहा रुपये असा दर आहे. सध्या शिरोडा, आरोंदा, रेडी पंचक्रोशीतील शेती बागायतदार या बाजारपेठेमध्ये लहान-मोठे कापे व बरका फणस आणत आहेत. ‘बाहेरून काटे आणि आतून गोड’ अशी ओळख असलेला फणस व्यावसायिकदृष्ट्या मात्र उपेक्षितच राहिला. आंबा, काजू, कोकम, जांभूळ आदी ‘कोकणी मेव्यात’ महत्त्वाचे स्थान असलेला फणस काही मोजके पदार्थ आणि बाजारातील विक्रीपुरताच मर्यादित राहिला. या पिकाच्या विविध उत्पादनांविषयी शेतकरी आणि बागायतदारांना चर्चासत्रे, शिबिरे आदींच्या माध्यमातून माहिती देऊन उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहित केल्यास याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल, यात शंका नाही. व्यावसायिकदृष्ट्या उत्पादन होणे गरजेचे कोकणात फणस लागवडीसाठी योग्य, पोषक वातावरण आणि जमीन आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हंगाम सुरू होतो व एप्रिल-मे महिन्यात परिपक्व फळ मिळते. फणस लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी, फणस प्रक्रिया उद्योगाची भरभराट होण्यासाठी फणसाच्या विखुरलेल्या जाती प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्र करून फणसाची जोपासना करणे काळाची गरज आहे. यासाठी आंबा-काजूप्रमाणे फणस लागवडीसाठी कृषी विभागाने अनुदान देणे आवश्यक आहे. रोजगार निर्मितीचे साधनबरका फणसापासून फणसपोळी, जॅम, चिवडा, जॅकफ्रूट, जेली, गोड लोणचे, चिप्स, प्लेक्स, स्कॅश पेय तसेच दैनंदिन आहारात सांदण, वडे, पापडी, आदी पदार्थही बनविले जातात. तसेच ग्रामीण भागातील बचतगटांमधूनही फणसापासून विविध सहउत्पादने बनविण्यात येत असून, त्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच गोड लोणचे बनविण्यासाठी कोवळा फणस वापरला जातो. पिकलेल्या फणसाच्या गऱ्याच्या बियांपासून जेली व जॅम, बरक्या फणसांपासून फणसपोळी, काप्या गऱ्यांपासून चवदार तिखट चिवडा, कच्च्या फणसांपासून चिप्स, बरक्यापासून स्कॅशपेय आदी विविध पदार्थ बनविले जातात. शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावेशासनाने शेतकरी आणि बागायतदारांना इतर पिकांप्रमाणेच फणसाचेही पीक घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच फणसावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आणावेत. तसेच लागवडीसाठी अनुदानही द्यावे. जेणेकरून येथील शेतकरी व बागायतदार फणस पिकाकडे आकर्षित होऊन जास्तीत जास्त उत्पादन घेईल. - प्रसाद रेडकर,बागायतदार, रेडी