शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'मुलाखत घ्यायचीय तर मंत्री, फोटो काढायचा तर मी'; राज्यपालांनी घेतली केसरकर, पत्रकारांचीच फिरकी

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2022 16:07 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एक दिवसाच्या सिंधुदुर्ग भेटीवर आले होते. सुरुवातीला तळेरे येथील एका शैक्षणिक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी वेंगुर्लेकडे प्रयाण केले.

- अनंत जाधव 

सावंतवाडी : महाराष्ट्राचे राजभवन तसेच राज्यपाल हे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. याचा प्रत्यक्ष अनुभव  शनिवारी राज्यपालांच्या सिंधुदुर्ग दौर्‍यात प्रशासनासह पत्रकार व राजकारण्यांना आला. राज्यपालांच्या मिश्कील स्वभावाने वातावरण चांगलेच हलके फुलके बनले होते. याचे कारण ही पत्रकार बनले.

पत्रकारांनी राज्यपालांना पत्रकार परिषद घेणार का विचारताच त्यांनी "मुलाखात लेना है तो  मंत्रीजी के पास जाव, फोटो खिचना है तो मेरे पास आओ'', असे म्हणत पत्रकारांचीच फिरकी घेतली. तसेच सोबत असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनाही चिमटा काढला. राज्यपालांच्या मिश्कील स्वभावाचे दर्शन सगळ्यांनाच घडले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एक दिवसाच्या सिंधुदुर्ग भेटीवर आले होते. सुरुवातीला तळेरे येथील एका शैक्षणिक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी वेंगुर्लेकडे प्रयाण केले. वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रातील विश्रामगृहात  भोजन व्यवस्था करण्यात आली होती. तेथे जेवण घेतल्यानंतर काही काळ राज्यपाल निवांत होते. त्यामुळेच त्यांच्या सोबत असणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विनंती करून राज्यपाल पत्रकार परिषद घेणार काय?अशी विचारणा केली.

मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितले. पण त्यापुढे जात मुलाखात लेना है, तो मंत्री जी के पास जाओ, असे सांगत मंत्री केसरकर यांच्याकडे बोट दाखवले. तर फोटो खिंचना है तो मेरे पास आओ, असे सांगितले. राज्यपालांच्या या मिश्किल स्वभावामुळे काही काळ मंत्री केसरकारांसह प्रशासनही गडबडले. पण लागलीच केसरकर यांनी राज्यपालांना आपणच मंत्रिमंडळ नेमता त्यामुळे तुम्हालाच सर्वाधिकार आहे, असे स्पष्ट करत आभार ही मानले.

तरीही पत्रकारांनी राज्यपालांना  तुम्हाला सिंधुदुर्ग कसा वाटला असे विचारले असता  खूप सुंदर, असे म्हणत सिंधुदुर्ग ही चांगला वाटला आणि येथील जेवणही चांगले होते, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा प्रशासनाकडून राज्यपाल यांना कॉफी टेबल बूक देण्यात आले. त्यांची त्यांनी स्तुती करतनाच खूप सुंदर बुक बनवले. असे मराठीतून म्हणत दाद दिली. मंत्री केसरकर यांच्या हस्ते हे कॉफी टेबल बुक राज्यपालांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग