शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हवा असल्यास नाणार गरजेचा : राजन तेली, शिवसेनेच्या भूमिकेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:32 IST

नाणार प्रकल्प झाला पाहिजे यासाठी भाजप पुढाकार घेणार असून, एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे प्रकल्प नको म्हणायचे हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे नाणार प्रकल्प झालाच पाहिजे, यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, रोजगाराच्या मुद्यावर प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात आम्ही आमचा उमेदवार उतरवू, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देरोजगार हवा असल्यास नाणार गरजेचा : राजन तेली शिवसेनेच्या भूमिकेला विरोध

सावंतवाडी : नाणार प्रकल्प झाला पाहिजे यासाठी भाजप पुढाकार घेणार असून, एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे प्रकल्प नको म्हणायचे हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे नाणार प्रकल्प झालाच पाहिजे, यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, रोजगाराच्या मुद्यावर प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात आम्ही आमचा उमेदवार उतरवू, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, सरचिटणीस मनोज नाईक, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, अमित परब, दादू कविटकर आदी उपस्थित होते. माजी आमदार तेली म्हणाले, कोकणात नाणारसारखा एक प्रकल्प येत होता. त्यातून लाख दीड लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार होता. पण शिवसेनेच्या विरोधामुळे हा प्रकल्प जाणार आहे. पण अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प हालवण्याची घोषणा केली नाही.

लोकांची मते जाणून घेणार, असे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक नाणारवासीय तसेच मुंबईतील प्रकल्प हवा आहे, अशांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल आणि त्यांना प्रकल्प येथेच झाला पाहिजे, असेही पटवून देणार असल्याचे तेली यांनी सांगितले. नाणार प्रकल्पासाठी कंपनी जागा बघत आहे. पण सरकारने अद्यापपर्यंत या प्रकल्पाला अन्यत्र जागा बघा असे सांगितले नाही असेही तेली यांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग