शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर भाजपा नेत्यांच्या वाटेला जा -प्रमोद जठार

By admin | Updated: February 20, 2017 20:40 IST

शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 20 - शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या वरवडे गावात काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यानी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या महिला उमेदवारावर भ्याड हल्ला केला आहे. यानिमित्ताने या कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. मात्र , या कार्यकर्त्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यानी भाजपच्या नेत्यांच्या वाटेला जावून दाखवावे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते संदेश पारकर उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले , सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीच्या वेळी नशेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या अंगावर गाडी घातली. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याना मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. ही सिंधुदुर्गच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच राणेंच्या दहशतवादाची हि शेवटची उचकी ठरेल एवढे मतदान जनतेने निर्भीडपणे भाजपला करावे. तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी.दहशतवादाने मतदाराना मतदानापासून वंचित ठेवणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे या घटनेकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसच्या कलमठ जिल्हा परिषद व तेथील दोन्ही पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांबाबत तक्रार करणार आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या घटनेची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचेही जठार यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपला जिल्ह्यात या निवडणुकीत सुयश मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या २५ पेक्षा जास्त आणि पंचायत समितीच्या ५० पेक्षा जास्त जागांवर भाजपा विजयी होईल.तसेच आतापर्यन्त एकूण मतदानापैकी भाजपाला मिळणारी १५ % मते या निवडणुकीत ४० % वर पोचतील. संदेश पारकर म्हणाले, राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे. ' सुंभ जळला तरी पीळ अजुन गेला 'नाही. त्यामुळेच वरवडेसारख्या घटना घडत आहेत. जिल्हावासीयांना शांतता हवी आहे. त्यामुळे राणेंच्या ठोकशाहीला जनताच २१ तारखेला मतदानातून हद्दपार करेल,असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)