शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे, मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल

By अनंत खं.जाधव | Updated: October 9, 2023 16:18 IST

आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही

सावंतवाडी : पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे असा सवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी किरण सामंत यांनी मोबाईलवर ठेवलेला स्टेटस हा राजकीय गंमत होती. ते कुठेही नाराज नसून ते लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा रात्र दिवस प्रचार करून निवडून आणू असेही त्यांनी यावेळी सागितले. मंत्री केसरकर हे आज, सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अशोक दळवी, शिवाजी सावंत, बबन राणे, बाबू कुडतरकर उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झालो आहे. त्यामुळे आता यापुढे मुंबई शहरमध्ये आठवड्यातून तीन दिवस देणार असून उर्वरित तीन दिवस सावंतवाडी मतदारसंघाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्लीत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी या नात्याने तेथे गेलो होतो. यावेळी मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक प्रश्न मांडले त्याला सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला. तसेच महाराष्ट्राचे अर्थ सचिव यांनी विशेष कौतुक केल्याचे सांगितले. सिंधुरत्नचा 65 कोटीचा निधी अखर्चित होता. अर्थ विभागाकडून हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तीन पक्षाचे सरकार असले तरी हे निर्णय घेणारे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणतेच निर्णय होत नव्हते. त्यामुळे कबुलायातदार प्रश्न मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लागू शकला नव्हता. तो प्रश्न मार्गी लागला तो फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून लागला असल्याचे ते म्हणाले.दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नाहीआम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ऐवजी दुसरे मैदान आम्ही घेतले आहे. त्यामुळे ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो हे आता जनतेने ओळखावे असे आवाहन केसरकर यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Dasaraदसराlok sabhaलोकसभा