शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माकड मृत आढळल्यास १०७७ वर माहिती द्या : शेखर सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:38 IST

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेली काही वर्षे उद्भवणाºया माकडतापावर मात करण्यासाठी बांदा तसेच दोडामार्ग तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांमधे माकडताप प्रतिबंधक लस सर्व नागरिकांना देण्याचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांचा याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तो त्यांनी द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह ...

ठळक मुद्दे माकडताप आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नविल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची ग्रामपंचायतीला  मानधन देण्यात येणारमृत माकडासंदर्भातील  माहिती देणाºयास ५० रुपये

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेली काही वर्षे उद्भवणाºया माकडतापावर मात करण्यासाठी बांदा तसेच दोडामार्ग तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांमधे माकडताप प्रतिबंधक लस सर्व नागरिकांना देण्याचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांचा याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तो त्यांनी द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.

यापुढे जिल्ह्यात कुठेही माकड मृत आढळले तर त्याबाबत तत्काळ १०७७ या क्रमांकावर दूरध्वनी करून माहिती द्यावी, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली. तसेच यापुढे ग्रामपंचायत परिसरात माकडाचा मृत्यू झाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची राहील, असेही ते म्हणाले.  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते. 

यावेळी शेखर सिंह पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा याठिकाणी माकडताप या आजाराने थैमान घातले आहे. या माकडतापावर मात करण्यासाठी दोडामार्ग परिसरातील तीन आणि बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येणाºया सर्व गावांतील नागरिकांना माकडताप प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. या लसीकरणासाठीचे बरेच टप्पे आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व जनतेने ही लस घेणे आवश्यक आहे. 

मात्र या गावांमधून आवश्यक तो प्रतिसाद जनतेकडून मिळत नाही. आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्केच लोकांनी ही लस घेतली आहे. ही लस माकडताप निवारणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही लस सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन शेखर सिंह यांनी यावेळी  केले.

आता जबाबदारी ग्रामपंचायतींची माकडताप या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यापुढे मृत माकड ग्रामपंचायत क्षेत्रात मिळाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची राहणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला  ५०० रुपये प्रति माकड मानधन देण्यात येणार आहे. तसेच मृत माकडासंदर्भातील  माहिती देणाºयास ५० रुपये देण्यात येणार आहेत. असे सांगतानाच जिल्ह्यात कुठेही मृत माकड सापडल्यास त्या संदर्भातील माहिती १०७७ या क्रमांकावर तत्काळ दूरध्वनीद्वारे द्यावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा विशेषत: दोडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यांमधे प्रादुर्भाव आहे. मात्र त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात नाही. तरीही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यात टॅमी फ्ल्यू या गोळ्या मोठ्या प्रमाणात असल्याचेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.