शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तर शैक्षणिक दर्जा घसरेल

By admin | Updated: May 14, 2017 16:58 IST

केवळ डिजिटल अध्यापनावर आपण विसंबून राहिल्यास शैक्षणिक दर्जा घसरेल

ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 14 - समर्पित भावनेने अध्यापन करणाऱ्या हाडाच्या शिक्षकाची जागा डिजिटल अध्यापन पद्धती घेऊ शकणार नाही. प्रथम पाठ पद्धतीने अध्यापन करून त्यानंतर त्या विषयाची उजळणी करण्यासाठी त्याचा उपयोग करणेच खऱ्या अर्थाने उचित ठरेल. केवळ डिजिटल अध्यापनावर आपण विसंबून राहिल्यास शैक्षणिक दर्जा घसरेल, असे मत प्रा. महेंद्र नाटेकर यांनी येथे व्यक्त केले.कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 मध्ये डिजिटल अध्यापन पद्धतीविषयी जाणून घेण्यासाठी प्रा. नाटेकर व अन्य मान्यवरांनी शुक्रवारी भेट दिली . तसेच डिजिटल अध्यापन पद्धतीविषयी यावेळी शिक्षकवर्गाशी चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष लोकरे, प्रा. पी. बी. पाटील, एस. एस. पाटील, के. एस. दळवी तसेच प्रशालेतील अन्य शिक्षक उपस्थित होते.यावेळी प्रा. नाटेकर म्हणाले, डिजिटल अध्यापन पद्धतीमुळे शैक्षणिक दर्जा उंचावत आहे, असे शिक्षणातील फारसे काही कळत नसलेले तथाकथित शैक्षणिक तज्ज्ञ तसेच काही लोकप्रतिनिधी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत. खरे तर शासनाच्या बिनबुडाच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे वाटोळे झाले आहे. काही वर्षापूर्वी शैक्षणिक दर्जा घसरत असताना विद्यार्थ्याची गळती थांबविण्यासाठी चौथी पर्यन्तची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे शैक्षणिक दर्जा आणखीनच घसरला. हे लक्षात आल्यावर चौथीपर्यंतची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आली. परीक्षा न घेतल्याने शैक्षणिक दर्जा घसरतो हे माहीत असूनही विद्यार्थी नापास झाला तर त्याच्यावर खर्च केलेला पैसा वाया जातो. त्यामुळे पुन्हा पहिली ते आठवी पर्यन्तची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे शैक्षणिक दर्जा कमालीचा घसरला.हे लपविण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे 20 टक्के गुण प्रत्येक विषयाला देण्याचा शासनाने निर्णय घेतला. सर्व विद्यार्थी पास झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. नियोजन पध्दतीने विद्यार्थ्याना व संस्थाना विना अनुदान तत्वावर मंजूरी देण्यात आली. त्यात राजकारण्यानी आणि तथाकथित शिक्षण सम्राटानी आपल्या तुंबडया भरल्या. मातृभाषेतून शिक्षण दिल्यानेच उत्तम संस्कार होतात. हे मान्य असूनही आपल्या तुंबड्या भरण्यासाठीच सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळाना मंजूरी दिली जात आहे. तर एका बाजूला मराठी माध्यमाच्या शाळा मोड़कळीस येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. याकडे लक्ष देण्यापेक्षा शासनाकडून विनाकारण डिजिटल शाळेचे स्तोम माजविले जात आहे. याला काय म्हणावे? असा प्रश्नही नाटेकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्यकर्त्याना शिक्षणातील भ्रष्टाचारा व्यतिरिक्त काहीच दिसत नसल्याने शिक्षण तज्ञांच्या समितिकडेच शिक्षण खात्याचा पदभार दिला पाहिजे.असेही ते यावेळी म्हणाले.