शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

विलवडे कृषिसंपन्न गावातील आदर्श तरूण शेतकरी

By admin | Updated: August 30, 2015 22:53 IST

प्रमोद दळवींनी केली भाड्याच्या जमिनीत केळी लागवड

महेश चव्हाण-ओटवणे  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषिक्रांतीत अग्रेसर असणाऱ्या विलवडे गावाचा (ता. सावंतवाडी) कृषी इतिहास प्रख्यात आहे. अशा या कृषिसंपन्न गावातील प्रमोद राघोबा दळवी या तरुणाने शेतीचा नवा आलेख याठिकाणी उंचावला आहे. आपल्या तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीमध्ये केळीच्या तीन हजार रोपांची लागवड करून बेरोजगार तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कृषिसंपन्न विलवडे गावात भाजीपाल्याचे मळे हे येथील शेतकऱ्यांचे पारंपरिक आर्थिकतेचे साधन. वडिलोपार्जित मिळालेला हा मार्ग पत्करून स्थानिक शेतकरी आजही कुटुंबाची गुजराण करतात. शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला बांदा-सावंतवाडी या बाजारपेठेत विकून दैनंदिन रोजीरोटीचा मार्ग सुकर होतो. पण ज्या पध्दतीने या शेतीपिकाचे आर्थिकदृष्ट्या व्यवसायात रुपांतर व्हायला हवे, त्या पध्दतीने होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून बी. एस्सी. अ‍ॅग्रीकल्चरल (उद्यानविद्या) पदवीप्राप्त प्रमोद राघोबा दळवी यांनी केवळ रोजीरोटीपुरती शेती न करता शेतीचे व्यावसायिकीकरण करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या भागामध्ये वातावरण उष्ण-दमट असल्याने या समन्वय स्थितीत केळीचे उत्पादन करण्याचा प्रयोग त्यांनी हाती घेतला. गोवा राज्यात त्याला मागणीही मोठी असल्याने त्यांना ही शेती फायदेशीर ठरत आहे. यासाठी त्यांनी ‘सावरबोणी’ या केळीच्या भाजीची निवड केली. प्रथम त्यांनी २००३ मध्ये अर्धा एकर जमिनीमध्ये या सावरबोणी केळीची प्रायोगिकतत्त्वावर लागवड केली. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने आणि या भाजीच्या केळीला मागणीही भरपूर असल्याने अंतरा-अंतराने या केळीच्या लागवडीत वाढ करत यावर्षी त्यांनी तब्बल तीन हजार केळींची लागवड केली आहे. हे पीक आता उत्पन्नाच्या वाटेवर आले असून, येत्या काही दिवसांत त्याची तोडणी दिवसात केली जाणार आहे. या भाजी केळी उत्पादनासाठी जवळजवळ मालकीचे आणि भाडेतत्त्वातून सुमारे चार एकर क्षेत्र त्यांनी लागवडीखाली आणले आहे. प्रथम प्रायोगिकतत्त्वावर शेती करताना त्यांनी इन्सुली येथील शेतकऱ्यांकडून १०० बी विकत घेतले. त्यानंतर याच शेतीतून स्वत: बी काढून त्यावर कीटकनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करून लागवड करू लागले. आज जी तीन हजार रोपटी उभी आहेत, ती त्यांनीच काढलेली बियाणी आहेत. एकदा बी पाळे-मुळे काढल्यानंतर स्वच्छ करून जवळजवळ १४ ते १५ दिवसांनी त्याला अंकुर फुटतो. बी पुरल्यानंतर जमीन थोडी ओली राहील, हे दैनंदिन पाहावे लागते. विशेषकरून उन्हाळ्याच्या हंगामात लागवड केली. यावेळी जास्त पाणीसाठा वापरला तर केळीचे उत्पादन चांगले येऊ शकते, असे प्रमोद दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.