सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातूून राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला द्यायची, ते मीच ठरविणार आणि त्याला निवडून आणण्याची हमीही मीच घेणार आहे. त्यामुळे कोणीही तिकिटासाठी गद्दारी करून गेल्यास त्याला उद्दिष्ट साध्य करता येणार नाही, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हाणला. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर त्यांनी पहिला राजीनामा द्यावा, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केल्यानंतर ते आज, गुरुवारी सिंधुदुर्गमध्ये आले. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, संजू परब, मनीष दळवी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर, विशाल परब, आदी उपस्थित होते.यावेळी उद्योगमंत्री राणे म्हणाले, पक्षाचा आग्रह आहे की, मी आणि नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे आम्ही दोघेही निवडणूक लढविणार आहोत. / पान ७ वरइको-सेन्सिटिव्ह शिवसेनेलाच हवा होताइको-सेन्सिटिव्हची मागणी शिवसेनेनेच केली होती आणि आता अधिस्थगन उठल्यावर शिवसेनाच त्याचे श्रेय घेत आहे, असा आरोप करताना राणे म्हणाले, आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केल्यामुळेच हे अधिस्थगन उठले आहे. त्यामुळे याचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये. सूर्याजी पिसाळांना मीच अन्नपाण्याला लावलेकोण कुठून उभा राहणार, याचे ज्याचे त्याने ठरवावे; पण निवडणूक लढवत असताना त्याने काँग्रेसचा पहिला राजीनामा द्यावा आणि मगच निवडणूक लढवावी. या सूर्याजी पिसाळांना मीच अन्नपाण्याला लावले. माझ्या जीवावर बंगले बांधून आता गद्दारी करतात, त्यांना करू देत. या सूर्याजी पिसाळांवर माझे बारीक लक्ष आहे, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी राजन तेली यांचे नाव न घेता केली.उमेदवारी मिळाली असे समजू नकाराजन तेलींनी काल, बुधवारी सावंतवाडी मतदारसंघातून उभे राहण्याची घोषणा केली. याबाबत राणेंना विचारले असता राणे म्हणाले की, राष्ट्रवादीचा उमेदवार मीच ठरवणार आहे. त्यामुळे कोणी सांगत असेल मला राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार, तर त्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात, अर्ज करावा लागतो. त्यानंतर मुलाखती होतात. नंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे आज पक्षात गेल्यावर उद्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल, असे कोणीही समजू नये.
राष्ट्रवादीचा उमेदवार मीच ठरविणार :राणे
By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST