शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

मनसेशी माझा कोणताही संबंध नाही

By admin | Updated: June 22, 2014 01:43 IST

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक : अभिषेक वेंगुर्लेकर यांची स्पष्टोक्ती

वेंगुर्ले : मनसेचे जिल्ह्यात अस्तित्व असते तर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले नसते. मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि हितचिंतक यांच्यामुळेच नगरसेवक म्हणून निवडून आलो. उपनगराध्यक्ष म्हणून माझी झालेली बिनविरोध निवड ही सुध्दा नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांमुळेच झाली आहे. त्यामुळे माझा मनसेशी कोणताही संबंध नाही. यापुढे मनसेच्या स्वयंघोषित नेत्यांनी माझा मनसेशी संबंध जोडू नये, असे आवाहन वेंगुर्लेचे उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. अभिषेक वेंगुर्लेकर हे मनसेत असल्याचे सांगत आहेत, तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी स्पष्ट केले होते. तर त्यांच्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील, अशी माहिती मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी कणकवली येथे पत्रकारांना दिल्याचे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर याचा खुलासा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वेंगुर्लेकर बोलत होते. उपनगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मी कोणत्याही गटाचा आणि कोणत्याही पक्षाचा नसून जनतेचा सेवक असल्याचे जाहीर केले होते. जुलै २०१३ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मनसेने मला निलंबित केल्याचे वृत्तपत्रातून वाचले. परंतु, मला मात्र तसे कोणतेही पत्र अद्याप मिळालेले नाही. तरीदेखील त्याचवेळी माझा मनसेशी संपर्क तुटला होता, असे वेंगुर्लेकर यांनी सांगितले. ज्यावेळी माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली होती, त्यावेळी आताचे मनसेचे नेते गप्प का होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नगरपरिषदेच्या निवडणुकीत मनसेचे पानिपत होताना वेंगुर्लेतून केवळ मी एकमेव मनसेचा नगरसेवक निवडून आलो होतो. मालवण व सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक लढविलेल्या मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. त्यामुळे मी मनसेमुळे नाही, तर जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच निवडून आलो. राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन केले असते तर जिल्ह्यातील मनसेचे उमेदवार निवडून आले असते. माझा मनसेशी काहीही संबंध नाही, यापुढे मनसेच्या नेत्यांनी अभिषेक वेंगुर्लेकर हा विषय काढू नये, असा इशारा वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. मनसेचे परशुराम उपरकर व राजन दाभोलकर यांचे मनसेमध्ये जे दोन गट आहेत, त्यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात मनसेने आपले उमेदवार निवडून दाखवावेत. नंतरच मनसेच्या स्वयंघोषित नेत्यांनी विधानसभेची स्वप्ने पहावीत, असा सल्लाही अभिषेक वेंगुर्लेकर यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)