शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाने वैभववाडीचे जनजीवन विस्कळीत, शेकडो घरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 20:27 IST

तालुक्यात दुपारनंतर आलेल्या चक्रीवादळाने दाणादाण उडवून दिली. कोकिसरे नाधवडेसह अनेक गावांतील घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

वैभववाडी : तालुक्यात दुपारनंतर आलेल्या चक्रीवादळाने दाणादाण उडवून दिली. कोकिसरे नाधवडेसह अनेक गावांतील घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तर, तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग सायंकाळी चारपासून ठप्प असून बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने झाडे हटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत महामार्ग खुला होण्याची शक्यता धुसर होती. त्यामुळे संपुर्ण फोंडामार्गे वळविण्यात आली. दरम्यान, अनेक गावातील वीजवाहिन्या तुटल्या असून वीजेचे खांब मोडून पडल्याने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्याचवेळी झालेल्या चक्रीवादळाने वाभवे, नारकरवाडी, कोकिसरे, नाधवडे, सोनाळी नापणे परिसराला तडाखा दिला. त्यामुळे या परिसरातील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे ते कोकिसरे नारकरवाडी दरम्यान जुनाट वटवृक्षासह शेकडो झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सोनाळी फाट्यानजीक आणि वाभवे बाणेवाडीनजिक झाडे कोसळून मार्ग बंद झाला होता. यापैकी बाणेवाडी येथील झाडे हटवून मार्ग वाहतुकीस खुला केला. त्यामुळेच वैभववाडी तळेरे मार्गावर सुमारे दोन तास अडकून पडलेली वाहने फोंडामार्गे वळविण्यात आली.शेकडो झाडे कोसळलीकोकिसरे नारकरवाडीपासून नाधवडेपर्यंत शेकडो झाडे कोसळली. त्यामध्ये काही उन्मळून तर बहुतांश झाडे मोडून पडली. नारकरवाडीच्या मोठ्या वळणावरील आंब्याचे मोठे झाड मोडून रस्त्यावर कोसळले. तेथून पुढे फाटकापर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर झाडेच होती. त्यामुळे पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरु होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग खुला होण्याची शक्यता धुसर होती. अनेक घरांवर झाडे कोसळून लाखोची हानी झाली असून तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग