शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात सव्वा कोटी वसूल

By admin | Updated: November 17, 2016 22:11 IST

नोटा बंदचा परिणाम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टीसह पाणीपट्टीची विक्रमी वसुली

रत्नागिरी : ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहा दिवसांमध्ये १ कोटी ५ लाख ६ हजार १०४ रुपये घरपट्टी आणि १८ लाख ६५ हजार ८३२ रुपये पाणीपट्टीची विक्रमी वसुली केली. केंद्र शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली होती. शासनाच्या या निर्णयाने ग्रामपंचायती व इतर विभागानेही या नोटा घेण्यास नकार दिला होता. मात्र, ८ नोव्हेंबर रोजी शासनाने ग्रामपंचायतींना ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेण्याचे आदेश दिल्यानंतर पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी धावपळ उडाली होती. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये जोरदारपणे राबविली जाते. त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वसुली होते. यावेळी शासनाने नोटा बंदी केल्याने या जुन्या नोटा खर्च कुठे करायच्या, असा प्रश्न अनेकांना सतावत होता. मात्र, शासनाने ग्रामपंचायतींना जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी एकच गर्दी झाली होती. ९ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी नोटा बंदीच्या दिवसांमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीची मिळून एकूण १ कोटी २३ लाख ७१ हजार ९३६ रुपये वसुली केली. शासनाच्या नोटाबंदीच्या आदेशानंतर अनेकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याने ग्रामपंचायतींच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी जास्तीत जास्त प्रमाणात वसूल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)ग्रामपंचायत करवसुली (घरपट्टी)तालुकादि. ९ ते ११ नोव्हेंबरमध्येदि. १२ ते १४ नोव्हेंबरमध्येवसूल झालेली रक्कमवसूल झालेली रक्कममंडणगड२,५५,७८५२,६२,०७१दापोली२५,२००१,१०,०००खेड२,०३,१६५२,१८,५०७चिपळूण५,५५,५००२,९५,५००गुहागर२,०६,२३२१,६१,४२६संगमेश्वर३,४०,२२५११,७९,०४१रत्नागिरी१८,८०,८६०४४,६८,०५२लांजा८६,२४०४०,३००राजापूर१,५०,०००६८,०००ग्रामपंचायत करवसुली (पाणीपट्टी)तालुकादि. ९ ते ११ नोव्हेंबरमध्येदि. १२ ते १४ नोव्हेंबरमध्येवसूल झालेली रक्कमवसूल झालेली रक्कममंडणगड१,१५,८७०१,२७,४३५दापोली४८,०००७९,२००खेड९७,७४८८८,०००चिपळूण३,२५,०००५०,४५०गुहागर६,४६००संगमेश्वर१,१५,२०११,४१,८०९रत्नागिरी४,७०,९००१,०३,९९९लांजा२५,४००२४,१६०राजापूर३१,२००१५,०००