शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

एकाचवेळी शेकडो वाद्यांचे गुंजन ठरले लक्षवेधी!, सिंधुदुर्गातील वरवडेत संगीत विश्वातील नवा विक्रम

By सुधीर राणे | Updated: March 2, 2023 12:34 IST

यानिमिताने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करण्यात आली

कणकवली : तालुक्यातील वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात एक हजार पालक तसेच  विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा, तबला, हार्मोनियम, ढोलक, मृदंग, टाळ, हलगी, दिमडी, सिन्थेसायजर, संबळ यासह शेकडो वाद्ये सलग एक तास वाजवून संगीत विश्वातील एक नवा विक्रम केला. या उपक्रमाच्या निमित्ताने एकाचवेळी हजार वाद्यांचे गुंजन लक्षवेधी ठरले. दरम्यान, या उपक्रमाची नोंद ग्लोबल रेकॉर्ड अँड रिसर्च फाउंडेशनकडे झाली असून विक्रम करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यानिमिताने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. राष्ट्रीय विज्ञान दिन व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम जयंतीचे औचित्य साधून आयडियल इंग्लिश मेडीयम स्कूल,सोमस्थ अकादमी कणकवली आणि सिंधुगर्जना ढोल ताशा पथक यांच्या विद्यमाने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये 'हम होंगे कामयाब', 'मेरा जुता है जपानी', 'हे राष्ट्र देवतांचे ', 'बलसागर भारत होवो' ही गाणी विद्यार्थ्यानी गात वातावरण देशभक्तिमय केले. पालक व विद्यार्थ्यांनी ताशा, ढोल, तबला, हार्मोनियम, ढोलकी ,टाळ आदी वाद्ये एकाचवेळी वाजवून आसमंत निनादून सोडले. ज्ञानदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, नीलेश महिंद्रकर, डी. पी. तानावडे, शीतल सावंत, सावी लोके, राजेश शिर्के, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, अशोक करंबेळकर, पत्रकार गणेश जेठे, महेश सावंत, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात खारेपाटण विद्यालय, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २, जिल्हा परिषद शाळा कलमठ, डिगस हायस्कूल, आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग