शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील आचऱ्यात शाही थाटात ऐतिहासिक रामनवमी उत्सवास प्रारंभ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 23, 2023 17:37 IST

रामनवमी उत्सवात विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी

आचरा (सिंधुदुर्ग) : आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास बुधवारी संस्थानी थाटात सुरुवात झाली. हा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत चालणार आहे. रामेश्वर मंदिरात रघुपतीच्या मूर्तिचे आगमन झाले. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागांतून बँडपथके दाखल झाली आहेत.बुधवारी सायंकाळी शाही थाटात ''श्रीं''च्या पाषाणाला न्हावू घालण्यात आले. त्यानंतर पुराण वाचन करण्यात आले. नंतर श्रींच्या दरबारात हजेरी लावलेल्या कलाकारांनी आपली गायन सेवा सादर केली. तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपरिक थाटात श्री विष्णूची मूर्ती, शृंगारलेली पालखीत विराजमान झाली. ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे कीर्तन असा दिनक्रम रोज ललिता पंचमीपर्यंत चालणार आहे.

रामनवमी उत्सवात विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानीशुकवार, २४ रोजी सुधांशु सोमण (मिठबाव) यांचे गायन, शनिवार, २५ रोजी सायंकाळी ५ वाजता गायन कर्यक्रम, रविवार, २६ रोजी सकाळी १० वाजता दिलीप ठाकूर यांचे गायन, सायंकाळी ५ वाजता गायिका समीक्षा भोबे - काकोडकर, गोवा यांचा शास्त्रीय गायन कार्यक्रम होणार आहे. सोमवार, २७ रोजी गायक विनय वझे व सहकारी यांचे गायन, मंगळवार, २८ रोजी सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजता गायक नितीन ढवळीकर यांची गायन मैफील, बुधवार, २९ रोजी सायंकाळी ५ वाजता गायक भाग्येश मराठे (ठाणे) यांची संगीत मैफील.

३० मार्च रोजी रामनवमी उत्सवगुरुवार, ३० रोजी रामनवमी उत्सव होणार असून, रामजन्माचे कीर्तन मिलिंदबुवा कुळकर्णी करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता गायिका निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन होणार आहे. शुक्रवार, ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता गायिका निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन, शनिवार, १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ, आचरा यांचा कार्यक्रम ''आनंदरंग पांडुरंग पांडुरंग'' हा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार, ५ रोजी रात्री ११ वाजता हनुमान जयंतीनिमित्त रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे ''गाव तसो चांगलो'' हे दोन अंकी नाटक होणार आहे. गुरुवार, ६ रोजी रोजी हनुमान जयंती, श्री हनुमान जन्माचे कीर्तन मिलिंदबुवा कुळकर्णी करणार आहेत. या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग