गुहागर : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गेली अनेक वर्षे ऐतिहासिक अशा आनंदीबार्इंच्या वाड्यात सुरू आहे. मात्र, बांधकाम खात्याने आता हे कार्यालय शेजारील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करुन हा ऐतिहासिक वाडा पर्यटकांना बघण्यासाठी खुला करावा, अशी सूचना गुहागरचे सभापती राजेश बेंडल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे. राघोबा दादा पेशवे यांच्या पत्नी आनंदीबाई मूळच्या गुहागर तालुक्यातील मळण गावच्या होत्या. त्यांच्यासाठी आज उभ्या असलेल्या तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस विश्रामधाम बांधण्यात आले होते. त्याठिकाणी देवघरही होते. तालुका अस्तित्त्वात आल्यानंतर याठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय सुरू करण्यात आले. गेली अनेक वर्षे या ठिकाणी हे कार्यालय सुरू आहे. वाड्याची रचना पर्यटनाला भूरळ घालणारी असल्याने हा वाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी सूचना बेंडल यांनी सभापतींना केली. या वाड्याबाबत पुरातत्व विभागाकडे कोणती कागदपत्रे आहेत, याची उत्सुकता असून, पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
आनंदीबार्इंचा ऐतिहासिक वाडा
By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST