शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान!, राज्य परिवहन महामंडळाचे आयोजन

By सुधीर राणे | Updated: May 10, 2023 17:11 IST

विजेत्या बसस्थानकांना अडीच कोटींची बक्षीसे

कणकवली : दोन वर्षाचे कोरोना संकट, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचा संप यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आणि राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळाने पुन्हा एकदा एसटीचा गाडा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात १ मे ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीसे देवून गौरविण्यात येणार आहे.या अभियानासाठी राज्य परिवहन महामंडळामध्ये मध्यवर्ती स्तर व विभागीय स्तर अशा दोन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. स्वच्छता अभियानाचा आराखडा तयार करणे, मुल्यांकनासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करणे, अभियानाचे सर्व्हेक्षण करून योग्य बदलांसह मार्गदर्शन करणे ही या समितीची कार्यकक्षा आहे. महामंडळाच्या सर्व स्थानकांचे भौगोलिक स्थान, प्रवासी चढउतार, बस स्थानक, बसफेऱ्यांची संख्या समान नाही, अर्थात सर्वांना समान संधी मिळण्यासाठी काही निकषांच्या आधारे बसस्थानकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.विभागस्तरावर विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. त्यात विभागीय स्थापत्य अभियंता, उपयंत्र अभियंता, विभागीय कामगार अधिकारी, त्या विभागातील ज्येष्ठ पत्रकार, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. समितीने किमान दोन महिन्यांच्या अंतराने मध्यवर्ती समितीने ठरवून दिलेल्या विभागाची तपासणी करायची आहे. महामंडळाच्या ६ प्रदेशामध्ये प्रत्येकी ९ याप्रमाणे प्रादेशिक स्तरावर ५४ बसस्थानके पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. एकूण गुणांच्या ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त बसस्थानकांचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे.विजेत्या बसस्थानकांना अडीच कोटींची बक्षीसे !प्रादेशिक स्तरावर अ वर्ग बसस्थानक प्रथम क्रमांक रुपये १० लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५ लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, ब वर्ग प्रथम रूपये ५ लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय १.५० लाख व प्रशस्तीपत्र, क वर्ग बसस्थानक प्रथम १ लाख चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५० हजार व प्रशस्तीपत्र, तृतीय २५ हजार व प्रशस्तीपत्र.

राज्यस्तरावर विजेत्या बसस्थानकाच्या पारितोषिकाची रक्कम अ वर्ग प्रथम क्रमांक रूपये ५० लाख, चषक व प्रशस्तीपत्र, ब वर्ग प्रथम क्रमांक रुपये २५ लाख चषक व प्रशस्तीपत्र आणि क वर्ग प्रथम क्रमांक रूपये १० लाख चषक व प्रशस्तीपत्र अशी बक्षीसे आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग