शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

 महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात पण धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:01 IST

कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात पण धुळीच्या त्रासाने नागरिक हैराणनागरिकांना करावा लागतो धुळीतून प्रवास; वाहनचालकांसाठी धोकादायक

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.अनेकवेळा या धुळीमुळे अपघात होत आहेत. धुळीमुळे काहीवेळा वाहन चालकांना दिवसा वाहनांची लाईट चालू ठेवून प्रवास करावा लागतो. भरावाचे काम सुरू असताना धुरळा उडू नये, म्हणून ठेकेदार कंपनीकडून मातीवर पाणी मारणे गरजेचे आहे. काहीवेळा शहरात सर्व्हिस रस्त्यावर पाणी मारले जाते. पण त्यामुळे चिखल झाल्याने वाहने तसेच पादचारी घसरण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यकती सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महामार्गाच्या जवळ असलेले दुकान व घरांमध्ये धूळ उडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारीही हैराण झाले आहेत. महामार्गाच्या दोन्ही सर्व्हिस रोडवरून गटाराचे काम सुरु असल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. धुळीमुळे वाहने सावकाश चालवावी लागत असल्याने अनेक नोकरदार व्यक्तींना कामावर वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.कणकवली शहरातील उडणाऱ्या धुरळ्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकतामुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरातील चौपदरीकरण कामामुळे प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार झाले आहेत. धुरळ्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. ठेकेदाराने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग