शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election Voting: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सर्वाधिक मतदान, मालवणमध्ये किती.. जाणून घ्या

By सुधीर राणे | Updated: December 2, 2025 13:36 IST

दुपारी ३:३० पर्यंत ५९.६१ टक्के मतदान झाले

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीसाठी आज, मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत सरासरी २९ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत मतदानात चांगलीच वाढ झाली. ३:३० पर्यंत ५९.६१ टक्के मतदान झाले.सावंतवाडी नगरपरिषदेसाठी आतापर्यंत २५५३ पुरुष आणि २४८३ महिला मिळून एकूण ५०३६ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. या ठिकाणी आतापर्यंत २५.९५ टक्के एवढे मतदान झाले आहे. मालवण नगर परिषदेसाठी आतापर्यंत एकूण २३७५  पुरुष आणि १९८६ महिला मिळून एकूण ४३६१ जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी ३०.३२ टक्के एवढे मतदान झाले आहे. वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये आतापर्यंत १३५३ पुरुष आणि ११९४ महिला मिळून एकूण २५४८ जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी २५.१९ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर कणकवली नगरपालिकेसाठी आतापर्यंत २४०४पुरुष आणि २२०६ महिला मिळून एकूण ४६१० मतदारांनी मतदान केले आहे या ठिकाणी ३४.७२ टक्के एवढे मतदान झाले आहे. गेल्या चार तासात जिल्ह्यातील चारही ठिकाणी मिळून एकूण ८६८६ पुरुष आणि ७८६९महिला मिळून एकूण १६,५५५ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात चारही ठिकाणी शांततेत मतदान सुरू असून जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रनाही आपले काम चोख बजावत आहे.

दुपारी ३:३० पर्यंत ५९.६१ टक्के मतदान

  • मालवण - ६१.४८%
  • सावंतवाडी - ५३.८९%
  • वेंगुर्ला - ५७.८०%
  • कणकवली - ६७.३२%
  • जिल्हा - ५९.६१%
English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg Local Body Elections: Kankavli Leads in Voting, Malvan Figures

Web Summary : Sindhudurg's municipal elections see Kankavli leading with 34.72% voter turnout by 11:30 AM. Malvan recorded 30.32%, Sawantwadi 25.95%, and Vengurla 25.19%. Over 16,555 voters participated across the four locations, with peaceful polling reported and tight security maintained.