शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भारतात धावणार अतिवेगवान रेल्वे

By admin | Updated: August 21, 2016 23:08 IST

सुरेश प्रभू : रेल्वे संशोधन केंद्राचे रत्नागिरीत उद्घाटन

 रत्नागिरी : रेल्वे तासाभरात सहाशे किलोमीटर अंतर पार करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित केलेल्या मायग्रोव्ह या जगातील सर्वांत मोठ्या कंपनीशी केंद्र सरकारची लवकरच नवी दिल्लीत चर्चा होणार आहे. या तंत्राद्वारे भारतीय रेल्वेतही क्रांती घडविता येईल व शेकडो किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत पार करता येईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात रविवारी दुपारी १ वाजता रेल्वे संशोधन केंद्राचे मंत्री प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता, विद्यापीठाचे रजिस्ट्रार एम. ए. खान, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, आदी उपस्थित होते. प्रभू म्हणाले, दीडशे वर्षांपासून रेल्वेसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान यापुढे कालबाह्य ठरणार आहे. सर्वाधिक वेगवान रेल्वेचा प्रयोग चीनने याआधी केला होता. मात्र आता त्यापेक्षाही वेगवान म्हणजेच ५५० ते ६०० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेतही वापरून वेगाबाबत क्रांती घडवून आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना २ सप्टेंबरला दिल्लीत चर्चेसाठी बोलावले आहे. कोकण रेल्वे आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहयोगातून रेल्वेने सुरू केलेल्या ‘रेल्वे अभियांत्रिकी संशोधन केंद्रा’चे झालेले उद्घाटन हे भारतीय रेल्वेतील एक नवे पर्व आहे. या केंद्रात कोकणातील अनेक युवक, युवतींना रेल्वेशी निगडीत अनेक विषयांवरील संशोधन करण्याचे कोर्स सुरू पूर्ण करता येतील. त्यांच्यासाठी रेल्वेतच नोकरीची संधीही मिळू शकेल. त्याचा फायदा कोकणवासीयांनी घ्यावा, असे ते म्हणाले. रेल्वे संशोधन केंद्राच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी देशातील ६७९ विद्यापीठांमधून मुंबई विद्यापीठाची केलेली निवड हा एक ऐतिहासिक क्षण आहे. रेल्वे प्राधिकरणाच्या मदतीने रेल्वे संदर्भातील व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ अशा सर्व प्रकारच्या गरजांवर आधारित सर्व प्रकारचे अभ्यासक्रम या संशोधन केंद्रात सुरू करण्यात येतील. या कार्यक्रमापूर्वी मंत्री प्रभू यांच्या हस्ते संशोधन केंद्राच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी) रेल्वेचे विद्यापीठ देशात रेल्वेचे स्वत:चे अभियांत्रिकी संशोधन विद्यापीठ हवे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने प्रथम संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक ती तयारी रेल्वेकडून केली जात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचे स्वत:चे विद्यापीठ येत्या काही कालावधीत स्थापन होईल, असे मंत्री प्रभू म्हणाले. रेल्वे-विद्यापीठ समन्वयाचा अभाव रेल्वेच्या संशोधन केंद्राच्या कार्यक्रमात कोकण रेल्वे महामंडळाचे चेअरमन संजय गुप्ता हे व्यासपीठासमोरील महत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेत बसले होते. मात्र, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यांना नंतर व्यासपीठावर बोलावले. रेल्वेच्या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे चेअरमन व्यासपीठावर नसणे ही अयोग्य बाब होती. त्यामुळे कार्यक्रमाबाबत रेल्वे व विद्यापीठ यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले..... ४ समुद्राची सर्वाधिक माहिती असलेल्या मच्छिमारांच्या ज्ञानाचा ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ निर्माण करून उपयोग करावा. ४ इंजिनिअरिंगमधील सर्व शाखांच्या पदवीधारकांना रेल्वेत कामाची भरपूर संधी ४ काही मिनिटात शेकडो किलोमीटर अंतर कापणाऱ्या रेल्वे तंत्रज्ञानामुळे आधीचे सर्व तंत्र निरर्थक