शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

हेवाळे, बांबर्डेत हत्तींचा मुक्तसंचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 14:55 IST

 वन्य हत्तींच्या भर दिवसा थेट रस्त्यावरील दर्शनाने नागरिकांत कमालीची घबराट पसरली आहे. या कळपात दोन पिल्लू व एक मादी हत्तींचा समावेश आहे.

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात हेवाळे, बांबर्डे गावात मुख्य राज्यमार्गावर दिवसाढवळ्या वन्य हत्ती मुक्तपणे फिरू लागल्याने हेवाळे पंचक्रोशीतील नागरिकांत भीती पसरली आहे. यापूर्वी रानटी हत्तींचे अनेक हल्ले पचविलेल्या हेवाळे व पंचक्रोशीतील नागरिकांना आता तर जीवावर उदार होऊन घराबाहेर पडावे लागणार आहे. वन्य हत्तींच्या भर दिवसा थेट रस्त्यावरील दर्शनाने नागरिकांत कमालीची घबराट पसरली आहे. या कळपात दोन पिल्लू व एक मादी हत्तींचा समावेश आहे.रात्री नुकसानी आणि दिवसा भरवस्तीत व रस्त्यावर या हत्तींचा मुक्तसंचार सुरू आहे. गेली कित्येक वर्षे हेवाळे, बांबर्डे व घाटीवडे येथे वन्य हत्तीचे वास्तव्य असून नुकसान सत्र अद्यापही कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर हा वन्य हत्तींचा कळप हेवाळे, बांबर्डे घाटीवडे येथे असलेल्या अननस बागेत धुमाकूळ घालत होता. वनखात्याने वन्यहत्तींना लोकवस्ती व शेतातून नैसर्गिक अधिवासात पुन्हा पाठवण्यासाठी ५ जणांचे दैनंदिन गस्तीपथकसुद्धा हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे व बाबरवाडी गावासाठी तैनात केले आहे.मात्र सायंकाळी ७ची ड्युटी असूनही हे पथक रात्री १0 पर्यंत गावात फिरकत नाही. शिवाय ५ जणांची कागदोपत्री टीम आणि ड्युटीवर अवघे २-३ जण अशी अतिशय बेजबाबदार आणि शासकीय कर्मचा-यांच्या कर्तव्याला हरताळ फासणारी ड्युटी संबंधित कर्मचारी बजावत आहेत. तर एकदा गावात बांबर्डे येथे दाखल झाले की रात्री अन्य ठिकाणी गस्त घालण्याचीसुद्धा तसदी बिलकुल हे पथक घेत नाही. त्यामुळे वनखात्याचा बिनबोभाट कारभार तिलारी खो-यात सुरू आहे.   जनआंदोलन छेडण्याचा इशारापिलांमुळे मादी आक्रमक झाली असून, हत्तींचा रात्रंदिवस संचार असताना वनखाते सुशेगात आहे.  कोरोनामुळे नागरिक व शेतकरीसुद्धा सध्या घरातच अडकले असून, शेती बागायतीचे अतोनात नुकसान सुरू आहे. त्यामुळे जिल्हा उपवनसंरक्षक यांनी या परिस्थितीत तत्काळ सुधारणा करावी. अन्यथा मुख्य वनसंरक्षक यांचे लक्ष वेधून कोरोना आपत्ती संपताच मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा सक्त इशारा माजी सरपंच संदीप देसाई यांनी दिला आहे.