शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तिलारी घाट परिसरात पावसाचा हाहाकार; रस्त्यावर पाणी, काही काळ वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:34 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील लहान पूल, काॅजवे पाण्याखाली गेल्याने शिवाय पर्यायी रस्ते वाहून गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तिलारी घाटाच्या पायथ्याशी डोंगरातील चिखल आला आहे, तर येथील राणेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी वाहतूक ठप्प झाली, तर साटेली भेडशी येथील एक घर व आस्थापनेवर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. एकंदरीत तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला आहे.दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. मात्र, मंगळवारी पावसाचा अधिकच जोर धरला. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्यातील लहान पूल, काॅजवे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम करताना निर्माण केलेले पर्यायी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.साटेली-भेडशी वरचा बाजार येथे एक झाड घर व आस्थापनेवर कोसळले. यात पत्रे फुटले. झाड पडत असताना आवाज आल्याने सर्वांनी तेथून पळ काढल्याने ते बालंबाल बचावले. मात्र घर व आस्थापनाचे यात मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी कटरच्या साहाय्याने ते झाड कापले व जेसीबीच्या साहाय्याने ते बाजूला केले.