शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनाबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:10 IST

कोरोना व्हायरसबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकोरोनाबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवादव्हिडिओ कान्फरन्सद्वारे उपचाराच्या कार्यवाहीची माहिती

सिंधुदुर्गनगरी : कोरोना व्हायरसबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन कोरोना व्हायरस आजाराच्या प्रतिबंधात्मक व उपचारांच्या कार्यवाहीची माहिती घेतली.जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, सर्व ठिकाणी या आजाराबाबत जनजागृती बॅनरद्वारे मोहीम राबविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्क्रिनिंग कक्ष, संशयित रुग्ण निरीक्षणासाठी १० खाटांचा कॉरन्टाईन कक्ष, उपचार देण्यासाठी व्हेंटीलेटरसह २५ खाटांचा आयसोलेशन कक्ष, वैद्यकीय सेवा असणाºया खासगी रुग्णालयामध्ये २ खाटा आरक्षित ठेवण्याबाबत व्यवस्था करण्यात आली आहे.बसस्थानके, रेल्वे स्थानक येथे जनजागृती संदेश देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लॉजिंग, रिसॉर्ट येथे येणाºया परराज्यातील, परदेशातील पर्यटक व्यक्तींची माहिती देण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी संशयित रुग्णांची आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.शाळा, महाविद्यालये या ठिकाणी गर्दी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम न घेण्यासाठी संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींमार्फत आठवडा बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजनेचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी व्यापक प्रसिद्धी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलीआहे. रुग्णांना उपचार देण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा व सामुग्री उपलब्ध आहे. जिल्हा शल्य चिकित्सक व नोडल अधिकारी हे कोरोना आजाराबाबत माहिती देण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहननागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय यंत्रणेद्वारे देण्यात येणाºया माहितीवर विश्वास ठेवावा. कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. सर्दी, खोकला या आजारांसाठी स्वत: उपचार न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा.प्रतिबंधात्मक उपाययोजना करून स्वत:ची व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाsindhudurgसिंधुदुर्ग