शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

हापूसला साडेसाती!

By admin | Updated: February 15, 2016 23:55 IST

बागायतदार चिंतेत : गारठा वाढल्याने फळांची गळ सुरु

रत्नागिरी : हवामानात अचानक गारठा वाढल्यामुळे हापूसची साडेसाती वाढली आहे. थंडीमुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मोहोर येत असल्यामुळे फळांची गळ वाढली आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.गेले दोन दिवस मळभी वातावरण असल्यामुळे मोहोरावर कीड, भुरी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे पुनर्मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुनर्मोहोरामुळे आधीच्या मोहोरावर परिणाम होत आहे. शिवाय मोहोराला लागलेली फळे थंडीमुळे गळत आहेत. ही फळे वाचवण्यासाठी तसेच मोहोराचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. दरम्यान, सध्या नव्याने येणाऱ्या मोहोरास फळधारणा अल्प आहे. हा आंबा मे मध्ये तयार होणार आहे, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. लवकर पीक येण्यासाठी वापरलेल्या कृषी संजीवकांमुळे पावसाअभावी सुरुवातीला आलेल्या मोहोरावर कोणताही परिणाम झाला नाही. शिवाय फळांचेही रक्षण झाले. यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, आता आंब्याची आवक मंदावली आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, अथवा मे महिन्यात सरसकट आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे आंबा लवकर बाजारात आला तर चांगला दर मिळतो. मात्र, आवक वाढली तर दर घसरण्याची भीती आहे. जानेवारीच्या  शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला आहे. सुरुवातीचा आंबा उन्हामुळे लवकर तयार झाला. मात्र, आवक मंदावणार आहे.सुरुवातीचा हापूस आंबा असूनही ५०० ते १००० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. मार्चपर्यंत हापूसची ही आवक सुरू राहिली तरी प्रमाण अल्प असणार आहे. मार्चपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)धोक्याची घंटा?हापूसला प्रतिवर्षी सुरुवातीपासूनच अडचणींचा प्रवास सुरु होतो. यंदाही वाढलेल्या थंडीने हापूससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यामुळे भविष्यात हापूसचे उत्पादन किती येणार? याची चिंता आता बागायतदारांना सतावू लागली आहे.हवेत गारठा : आंब्याची गळहापूसची नुकतीच परदेशात निर्यात सुरू झाली आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा पिकावर परिणाम होत आहे. अतिथंडी तसेच अतिउष्मा आंबा पिकाला मारक आहे. थंडीमुळे गळ, कडक उन्हामुळे आंबा भाजणे, तर पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे. निसर्गावर अवलंबून असणारे पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असले तरी निसर्गापुढे सर्वच हतबल आहेत. - प्रदीप सावंत,बागायतदारबऱ्याच फळांची गळ?गारठा असाच सुरु राहिला तर पहिल्या मोहोराचा आंबा बऱ्याचअंशी गळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.