शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हापूसला ‘कर्नाटकी’ आव्हान

By admin | Updated: April 13, 2016 00:12 IST

रत्नागिरी अल्फान्सो : जिओग्राफीक इंडिकेशनसाठी बागायतदारांचे प्रयत्न

रत्नागिरी : रत्नागिरी हापूस आंब्यासमोर तशाच दिसणाऱ्या परंतु दर्जात कोणतीही बरोबरी होऊ न शकणाऱ्या कर्नाटकी हापूसने तगडे आव्हान उभे केले आहे. फळांचा राजा म्हणून देशात नव्हे; तर परदेशातही रत्नागिरी हापूसने नावलौकिक मिळविला आहे. मात्र, चव व दर्जा नसतानाही कर्नाटक हापूस हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जात आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या रत्नागिरी हापूसची बदनामी होत आहे. त्यावर जिओग्राफीक इंडिकेशन अर्थात भौगोलिक सांकेतांक वापरण्याचा पर्याय पुढे आला असून, शासनाकडे तशी मागणी केली जाणार आहे. कोकणातून हापूसची रोपे नेवून कर्नाटकात हापूसचे पीक घेतले जात आहे. मोठ्या प्रमाणात कर्नाटकचा हापूस सध्या बाजारात आहे. कोकणातून ७० टक्के हापूस हा आखातात निर्यात केला जातो. मात्र, त्यामध्येही कर्नाटक हापूसची घुसखोरी होत आहे. तसेच कोकणातील काही भागातूनही कोवळा हापूस पाठविण्याचे प्रकारही होत आहेत. अशा हापूसमुळे चांगल्या प्रकारे पीक घेऊन आखातात पाठविलेल्या रत्नागिरी हापूसची बदनामी होत असून, त्याचा दर कमी होण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कर्नाटक हापूस आहे तरी काय, याबाबत रत्नागिरीतील आंबा बागायतदारांकडून माहिती घेतली असता बेचव असा हा हापूस असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. रत्नागिरी हापूससारखाच दिसणारा हा कर्नाटक हापूस असून, हिरवा असताना रत्नागिरी व कर्नाटक हापूसमधील फरक सहसा ओळखता येत नाही. पिकल्यानंतर मात्र काही प्रमाणात वेगळ्या रंगामुळे कर्नाटकचा हापूस ओळखता येतो. रत्नागिरी हापूसची साल पातळ असून, पिकल्यानंतर त्याला मोहक घमघमाट सुटतो. मात्र, कर्नाटक हापूसची साल जाड असून, पिकल्यानंतरही त्याला घमघमाट तर सोडाच परंतु कोणताही गंध येत नाही. चवीलाही रत्नागिरी हापूसशी कोणतीही बरोबरी करू न शकणारा कर्नाटक हापूस असल्याचे बागायतदारांप्रमाणेच हापूस खवय्यांचेही मत आहे.परंतु समान दिसण्यामुळे व रत्नागिरी हापूस येण्याआधीच बाजारात येणाऱ्या कर्नाटक हापूसच्या कमी दरामुळे ग्राहकांना अस्सल रत्नागिरी हापूसचा स्वाद घेता येत नाही. रत्नागिरी हापूसची पत आखातात टिकून राहावी व बदनामी टळावी म्हणूनच जिओग्राफीक इंडिकेशनचा पर्याय पुढे आला आहे. त्याला शासनाकडून प्रतिसाद मिळतो की नाही, यावरच रत्नागिरी हापूसचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)रोखणार कसे : कोवळा हापूसही बाजारातआखातात दरवर्षी ७० टक्के हापूसची निर्यातकर्नाटकी हापूसमुळे रत्नागिरी हापूसची बदनामीलंगडा, दसेहरा आंबाही बाजारात दाखलभौगोलिक सांकेतांकाबाबत हापूस बागायतदारांना शासनाकडून निर्णयाची आशाकर्नाटक हापूसप्रमाणेच रत्नागिरी हापूससमोर केसर, लंगडा, दसेहरा यांसारख्या अन्य प्रांतातील आंब्यांचेही आव्हान निर्माण झाले आहे.