शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा...;' बॅनरची होतेय जबरदस्त चर्चा! जाणून घ्या प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 22:24 IST

सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता.

सावंतवाडी- पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा अनोख्या  बॅनरने सर्वाचे लक्ष वेधून घेतले या बॅनरची चर्चा  मात्र शहरातील नाक्यानाक्यावर सुरू होती. काहिनी तर या बॅनरचा फोटो घेत सर्वत्र व्हायरल केला होता. मात्र हा बॅनर पालिकेसमोरच लावल्याने अखेर प्रशासनाकडून तो जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

सावंतवाडी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत बुधवारी संपली आहे. यामुळे या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस शहरातील गांधी चौक परिसरामध्ये रवी जाधव या व्यावसायिकाने लावलेल्या स्टॉलवरून पालिका व जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता. पालिका प्रशासनाने तो स्टाँल अनधिकृत ठरवत  हटविला होता यासंदर्भात जाधव यांनी अकरा दिवस पालिका इमारतीसमोर मोती तलावा काठी भर पावसात उपोषणही केले होते. 

त्यावेळी जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करतांना आपल्यावर अन्याय केल्याचे म्हटले होते. आज सत्ताधाऱ्यांची मुदत संपताच त्यांचा ठळक स्वरुपातील सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा, बुरे दिन चले गये, अशा आशयाचा बॅनर चर्चेचा ठरला. जाधव यांनी सकाळीच हा बॅनर पालिकेसमोर लावताच प्रशासनाकडून तो हटविण्यात आला. 

जाधव यांनी लावलेल्या बॅनरवर, छत्रपती शिवाजी महाराज हे दिन दलितांचे कैवारी होते, उच्च निच्च, असा भेदभाव त्यांनी कधीच केले नाही. परंतु समाजाती काही लोक स्वार्था पायी एकीकडे छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव घेवून दुसरीकडे गोर गरीबांना छळतात. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहीली तरी देखील, आज ही आम्हाला न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये गोर गरीब आम्हा स्थानिक व्यापाऱ्यांना काही सत्ताधारी लोकांनी कशाप्रकारे उध्वस्त केल होत. हे साऱ्या जनतेने पाहीले आहे. न्यायासाठी लढत असताना माझ्या काळजी पोटी ११ ही दिवस भर रस्त्यात माझ्या आईच्या डोळ्यातून पडलेल्या त्या अश्रुंना मी कधीही विसरू शकणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोर गरीबांना आधार दिला, म्हणून सर्व सामान्य जनतेच्या व विरोधकांच्याही हृदयात त्यांना आजही एक विशिष्ट स्थान आहे. मी एक उच्च शिक्षित सामाजीक कार्यकरता आहे. हा माझा संघर्ष कुटच्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून आम्हा स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आहे,' असा मजकूर लिहीला होता.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीPoliticsराजकारण