शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

परप्रांतीय बोटींना अटकाव करा

By admin | Updated: February 25, 2015 00:09 IST

मच्छिमारांची मागणी : मालवणात गेले दोन दिवस धुमाकूळ

मालवण : महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात येऊन मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय बोटींविरोधात हर्णे बंदरात ‘सी वॉर’ पेटल्यानंतर या परप्रांतीय बोटींनी आपला मोर्चा मालवण बंदराकडे वळविला आहे. पोलीस आणि मत्स्य विभागाच्या अनास्थेमुळे परप्रांतीय बोटींचा धुमाकूळ वाढला आहे. येथील स्थानिक मच्छिमार परप्रांतीय बोटींचे अतिक्रमण खपवून घेणार नाहीत. हर्णे समुद्रातील ‘सी वॉर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने परप्रांतीय बोटींना अटकाव करणे आवश्यक आहे. अन्यथा मालवणच्या समुद्रात ‘सी वॉर’ पेटल्यावाचून राहणार नाही, असा इशारा येथील मच्छिमारांनी दिला आहे.मागील दोन दिवसांपासून मालवण समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुमाकूळ वाढला आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग किल्ल्यानजिकच्या समुद्रात १० वावाच्या आत येऊन कर्नाटक- मलपी येथील २० ते २५ यांत्रिकी ट्रॉलर्स मासेमारी करताना आढळून आले. या ट्रॉलर्सला रोखण्यासाठी येथील पारंपरिक व यांत्रिकी मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांची भेट घेतली.हर्णे बंदरात झालेला संघर्ष टाळण्यासाठी तातडीने शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी घारे यांनी केली. सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी परप्रांतीय बोटींविरोधात गस्तीची मोहीम हाती घेऊ, असे आश्वासन दिले. मच्छिमारांनी पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांच्याशीही संपर्क साधून माहिती दिली. यावेळी भाऊ मोर्जे, विकी चोपडेकर, पिटर मेंडीस, महेश दुदम, रॉकी डिसोझा, संतोष देसाई यांच्यासह मच्छिमार बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पारंपरिक पद्धतीची मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. येथील समुद्र मत्स्य व्यवसायास पोषक आहे. मागील काही दिवसांपासून या भागात परप्रांतीय बोटींचे अतिक्रमण वाढले आहे. या बोटींना रोखण्यास मत्स्य विभाग अपयशी ठरला आहे. मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. परप्रांतीय बोटींना रोखण्यास पोलीस यंत्रणाही कमी पडली आहे. परप्रांतीय बोटींना वेळीच रोखणे आवश्यक आहे. मत्स्य विभागाने यासाठी पोलिसांच्या मदतीने सागरी मोहीम आखणे आवश्यक आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करायला स्थानिक मच्छिमारांची तयारी आहे. शासकीय यंत्रणेने परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखण्यास अनास्था दाखविल्यास मच्छिमार आपल्या पद्धतीने या बोटींना पकडण्यासाठी पावले उचलणार आहेत.- दिलीप घारे, सचिव, श्रमजीवी रापण संघ