शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार ; परशुराम उपरकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:35 IST

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. पालकमंत्र्यांच्या सावंतवाडीतच अफू-गांजा तसेच जुगार जोरात असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.

ठळक मुद्देपालकमंत्री हटाव मोहीम राबवणार परशुराम उपरकर यांचा आरोप

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. पालकमंत्र्यांच्या सावंतवाडीतच अफू-गांजा तसेच जुगार जोरात असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, अमित इब्रामपूरकर, सुधीर राऊळ, राजू कासकर, अनिल केसरकर, ललिता नाईक, कृष्णा गावडे, ओंकार कुडतरकर ,गीता पाटेकर, संकेत मयेकर, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, जिल्ह्यात गेले काही दिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी येथील नरेंद्र्र डोंगरावर तेथील कुंड्या व बेंच मोडतोड करण्याचा प्रकार झाला होता. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी परिसरात बसल्या जाणाऱ्या परप्रांतीयांकडून झाला. याची अधिकृत माहिती व पुरावे आपल्याकडे आहेत.

नरेंद्र डोंगर परिसरात असलेल्या उद्यानात गांजा-अफू आदी अंमली पदार्थांचा मोठा वापर केला जातो. त्या ठिकाणी मटका जुगार खेळला जातो. त्यातून परप्रांतीयांकडून हा प्रकार झाल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकाराची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी आम्ही मनसेकडून करणार आहोत.उपरकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात केवळ घोषणाबाजी करण्याचे काम पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर करत आहेत. राज्यमंत्री असून सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध धंदे, दारू वाहतूक, अंमली पदार्थ, जुगार मटका आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात केसरकर अपयशी ठरले आहेत.

राणे यांच्या काळात मनसेने त्यांच्या विरोधात पालकमंत्री हटाव असे आंदोलन केले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती मनसे करणार आहे. केसरकर यांच्या विरोधात पालकमंत्री हटाव आंदोलन केले जाणार आहे. लवकरच याची घोषणा होईल, असे उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग