शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आंगणेवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 7, 2022 12:52 IST

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

मालवण (सिंधुदुर्ग) : पालकमंत्री नियुक्ती नंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान, राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रगती व विकास होत असताना सिंधुदुर्गच्यासाठी आपण अधिक प्रयत्नशील आहोत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी परिसरातील रखडलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब आदी उपस्थित होते.आंगणे ग्रामस्थांनी दिले निवेदनआंगणेवाडी मंदिर परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते, पायवाटा तसेच आंगणेवाडीला जोडणारे सर्व मुख्य रस्ते खड्डेमुक्त व्हावेत. रस्ते मार्ग डांबरीकरण व नूतनीकरण, नळपाणी योजना कार्यान्वीत व्हावी. भाविकांसाठी सुलभ शौचालय उभारणी व्हावी यासह अन्य मागण्या ग्रामस्थांच्या वतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. आंगणेवाडीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्द असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग