शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भुईबावड्यात घरफोड्या करणारा रंगेहात जाळ्यात

By admin | Updated: November 19, 2015 00:45 IST

तीन ठिकाणी चोरी : मुद्देमाल हस्तगत

वैभववाडी : भुईबावडा पंचक्रोशीतील एका गावात मंगळवारी भरदिवसा तीन घरफोड्या झाल्या. चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून भुईबावडा दूरक्षेत्रातील पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरट्याकडून मुद्देमाल हस्तगतही केला. मात्र, चोरट्याविरुद्ध कारवाई करण्याचे टाळून राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले. या गंभीर प्रकाराबाबत वैभववाडी पोलीस अनभिज्ञ होते, परंतु या गंभीर प्रकाराची चर्चा तालुक्यात जोरात असून, पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. भुईबावडा पंचक्रोशीतील एका गावात मुंबईस्थित तरुणाने स्वत:च्या गावातील तीन बंद घरे फोडली. त्यापैकी दोन घरमालक माध्यमिक शिक्षक आहेत. एका शिक्षकाच्या दरवाजाची कडी तोडत असतानाच त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने चोरट्याला रंगेहात पकडले. त्यानंतर भुईबावडा दूरक्षेत्रात संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे तेथील पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. चोरट्याकडून सोन्याच्या डझनभर अंगठ्या आणि दोन चेन हस्तगत केल्या. दिवाळीच्या सुटीनिमित्त हे शिक्षक गावी गेले होते. या संधीचा चोरट्याने फायदा घेतला. मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना गावाहून तत्काळ बोलावून घेतले. चोरटा गावातीलच असल्याने राजकीय वजन कामी आले. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी मांडवली करण्यात आली. शिक्षक गावाहून येताच चोरलेले दागिने मूळ मालकांना परत करून पोलीस आपल्या मुख्यालयी निघून गेले. या घटनेला तीस तास उलटले तरी वैभववाडी पोलीस ठाण्यात या गंभीर प्रकाराची यत्किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. (प्रतिनिधी)