शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

ग्रामपंचायतीसह ११ घरे फोडली

By admin | Updated: January 20, 2015 23:50 IST

कलमठमधील प्रकार : महिनाभरातील चौथी घटना ; पोलिसांसमोर आव्हान

कणकवली : परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून सोमवारी रात्री कलमठ ग्रामपंचायत कार्यालयासह परिसरात अकरा ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांमधून एकूण २१ हजार रोख रकमेसह दागिने चोरण्यात आले. या घरफोड्यांनी पोलिसांना भंडावून सोडले आहे. महिनाभरातील शहर परिसरातील हे घरफोड्यांचे चौथे सत्र आहे. सुप्रिया सुनिल घाडी (रा.कलमठ) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. कणकवली-आचरा मार्गावरील कलमठ ग्रामपंचायत कार्यालय, विठ्ठल मंदिरानजीक दोन घरे, कलमठ शाळेनजीक तीन घरे, बिडयेवाडीतील मठकर संकुलातील तीन घरे, कलेश्वर अपार्टमेंट आणि स्वरूप अपार्टमेंटमधील प्रत्येकी एक फ्लॅट फोडण्यात आला आहे. कलमठ ग्रामपंचायतीचा मुख्य दरवाजासह आतील दुसऱ्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून सामान विस्कटण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयात रोख रक्कम नव्हती. विठ्ठलमंदिर नजीक अनंत मधुसूदन पालकर यांच्या चाळीतील बंद खोली फोडून आतील लोखंडी कपाट उघडले. मात्र, त्यातून काही चोरीस गेले नाही. पालकर यांच्या घरापासून ५० फुटांवरील त्यांच्या सख्ख्या भावाचे एस.एम.पालकर यांचे घर फोडण्यात आले. ते मालवण येथे कामानिमित्त असतात. कलमठ प्राथमिक शाळेसमोरील प्रकाश गोपाळ कदम यांच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या दरवाजाची कडी तोडून लॅच पेचून चोरट्यांनी आत प्रवेश केला. प्रकाश कदम कुटुंबीय मुंबई येथे असतात. आतील बेडरूमचा दरवाजा चोरट्यांना उघडता आला नाही. शेजारीच नीळकंठ यशवंत प्रभू यांच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले. प्रभू पुणे येथे असतात. त्यांच्या घरातून नेमके काय चोरीस गेले हे समजू शकले नाही. काही अंतरावरील कुवळेकर चाळीत भाड्याने राहणाऱ्या सुनिता सुनिल घाडी यांच्या खोलीचे कुलूप तोडण्यात आले आणि आतील कपाटातील रोख ९ हजार रूपये, मंगळसूत्र, अंगठी, कानातील रिंग असा ऐवज चोरण्यात आला. घाडी शेजारच्यांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. बिडयेवाडीतील मठकर संकुलातील प्रणय गोळवणकर यांचे बंद घर फोडण्यात आले. गोळवणकर हे ठाणे येथे पोलीस खात्यात वरीष्ठ श्रेणी लिपीक म्हणून काम करतात. त्यांच्या घरातून दागिने चोरीस गेल्याचे समजते. मठकर संकुलातीलच दुसऱ्या इमारतीमधील पोलीस हवालदार अमोल धुमाळे यांचे घर फोडून आतील कपाट फोडण्यात आले. मात्र, या घरात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. धुमाळे हे ओरोस येथे पोलीस स्थानकात रात्रपाळीसाठी थांबले होते. तर त्यांची पत्नी कोल्हापूर येथे ट्रेनिंगसाठी गेली होती. बाजूच्या विंगमधील एम.व्ही.कदम यांचा बंद फ्लॅट फोडण्यात आला. श्रीमती कदम या पुणे येथे आपल्या मुलाकडे गेल्या होत्या. त्यांच्या लाकडी कपाटातील रोख १० हजार रूपये चोरण्यात आले. मात्र, कपाटातच अन्य ठिकाणी ठेवलेले दागिने सुरक्षित राहिले. कलेश्वर अपार्टमेंटमधील अनिल विद्याधर कुवळेकर यांच्या दरवाजाची कडी उचकटून काढण्यात आली. कुवळेकर कुटुंबीय गेले काही महिने रामगड येथे राहत असून त्यांच्या फ्लॅटमधूनही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. कलेश्वर अपार्टमेंटच्या शेजारच्या स्वरूप संकुलातील विनिता विकास सावंत यांच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आतील कपाटातील २ हजार रूपये चोरण्यात आले. सोमवारीच सावंत कुटुंबीय मुंबईला गेले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथकाला बोलावून तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकानेही चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी केली. (प्रतिनिधी)नाकाबंदी असूनही घरफोड्या वाढल्या कणकवली शहरात नाकाबंदी, पेट्रोलिंग सुरू असूनही घरफोड्या होत असल्याने पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. गेल्या महिनाभरातील शहर परिसरातील घरफोड्यांचे हे चौथे सत्र आहे. यापूर्वी २३ डिसेंबर रोजी कलमठ नाडकर्णी नगर परिसरातच ४ घरे फोडून ४० हजाराचा ऐवज चोरण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांतच शिवाजीनगर परिसरात चार घरे फोडून साडेतीन लाखांचा ऐवज चोरण्यात आला. १५ जानेवारी रोजी नाथ पै नगरातील दोन फ्लॅट फोडून ८१ हजाराची रोकड चोरण्यात आली होती.