शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी काम, सहा महिने थांब

By admin | Updated: February 7, 2017 23:21 IST

सावंतवाडी वनविभागातील प्रकार : घरावर पडलेले झाड तोडण्याच्या परवानगीसाठी उपोषण

सावंतवाडी : ‘सरकारी काम सहा महिने थांब’ याचा प्रत्यय सावंतवाडीत वासुदेव बांदेकर यांच्या प्रकरणात आला. घरावर पडलेल्या झाडाच्या तोडीची परवानगी मिळविण्यासाठी सहा महिने वाट बघावी लागली. फक्त पडलेले झाड या शब्दाच्या ठिकाणी झाड तोडणे असा शब्द हवा होता. पण वनविभागाने हा शब्द बदलण्यासाठी बांदेकर याना उपोषण करण्यास भाग पाडले. ऐन पावसाळ्यात घरावर पडलेल्या झाडांची तोड करण्यासाठी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल विजय कदम यांनी परवानगी नाकारल्याने वासुदेव बांदेकर यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी वनक्षेत्रपाल विजय कदम यांची चांगलीच कानउघडणी केली. किरकोळ कारणासाठी लोकांना एवढ्या टोकाची भूमिका घेण्यासाठी का भाग पाडता, असा सवाल केला. त्यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी त्यात हस्तक्षेप करीत बांदेकर यांना तातडीने परवानगी दिली जाईल, असे सांगितले.वासुदेव बांदेकर हे सावंतवाडी शहरात सबनीसवाडा येथे राहतात. २३ जूनला त्यांच्या घरावर ऐन पावसाळ््यात सागवानाचे मोठे झाड पडले. यात त्याचे सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. मात्र, घटनेदिवशी ६५ मिलीमीटर पावसाची नोंद न झाल्याने बांदेकर यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. मात्र, घरावर पडलेले झाड काढले तर त्याला वाहतूक पास लागणार तसेच वनविभागाच्या परवानगीशिवाय तोड करणेही शक्य नाही. म्हणून बांदेकर यांनी वनविभागाकडे परवानगी मागितली. पण वनविभागाने सुरूवातीला परवानगी दिली. त्यानंतर त्या दिलेल्या परवानगीमध्ये खाडाखोड केली.याबाबत वासुदेव बांदेकर यांनी वनविभाग तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवादही साधला. पण त्यांना ठोस आश्वासन मिळाले नाही. पालिकेने झाड तोडण्याची परवानगी दिली. पण वाहतूक परवानगी देण्यास वनविभाग टाळाटाळ करीत आहे. या विरोधात बांदेकर यांनी येथील प्रांतकार्यालय परिसरात मंगळवारी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी यात हस्तक्षेप करीत नियमात राहून तातडीने परवानगी दिली जाईल, असे यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर वासुदेव बांदेकर यांनी आपले उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)