शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने ‘सी-वर्ल्ड’चे सीमांकन निश्चित करावे !

By admin | Updated: September 16, 2016 23:43 IST

विनायक राऊत : भू-संपादनास स्थगिती म्हणजे ग्रामस्थांच्या लढ्याचा विजय

मालवण : ‘सी-वर्ल्ड’बाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. ग्रामस्थांचा वाढता विरोध लक्षात घेता भूसंपादनाचा आदेश स्थगित करण्यात आला असून प्रकल्पविरोधी ग्रामस्थांच्या लढ्याचा हा विजय आहे.आता शासनाने प्रस्तावित प्रकल्पाचे सीमांकन निश्चित करून वायंगणी-तोंडवळीत सी-वर्ल्ड साकारताना ग्रामस्थांवर अन्याय न करता वाटाघाटीने भू-संपादन करावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. सीमांकन निश्चित केल्यानंतर ग्रामस्थांच्या सहमतीने प्रकल्पाबाबत कार्यवाही केली जाईल. मात्र, यालाही ग्रामस्थांचा विरोध असेल तर जिल्ह्यातच प्रकल्प हलविण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मांडली.सी-वर्ल्डमुळेच जिल्ह्याचा कायापालट होईल, हा चुकीचा भ्रम आहे. सी-वर्ल्ड ग्रामस्थांना नको असेल तर सिंधुदुर्गातील मुणगे-देवगड येथील जागेचा विचार करावा लागेल. मुणगे येथील जमीन मालक सी-वर्ल्डबाबत सकारात्मक आहेत. काहींनी जमिनी देण्यास समर्थता दाखविली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयांची आठवड्याभरात भेट घेतली जाणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.जिल्ह्यातील सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ, आकारीपड, आचरा देवस्थान जमीन, महामार्ग चौपदरीकरण या सर्व प्रलंबित विषयांबाबत खासदार राऊत यांनी तळगाव येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. शासनाने प्रस्तावित केलेल्या सी-वर्ल्ड जागेचे सीमांकन होणे आवश्यक आहे. याबाबत शासनाने अभ्यास करून कार्यवाही करावी. सीमांकन प्रक्रिया झाल्यास नेमकी कोणती जागा बाधित होईल हे निश्चित होणार आहे. ग्रामस्थांवर अन्याय होऊ नये यासाठी वाटाघाटी करावी लागणार आहे. तरीही प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचा विरोध मावळला नसेल तर शासनाने जिल्ह्यातील देवगड-मुणगे अथवा अन्य जागेचा विचार करून ग्रामस्थांच्या सहमतीने जिल्ह्यातच प्रकल्प व्हावा, हीच भूमिका शिवसेनेची असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.बॉक्स - युतीचा निर्णय भाजपवर अवलंबूनजिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या युतीबाबत शिवसेना सकारात्मक आहे. युतीचा निर्णय भाजपवरच अवलंबून आहे. भाजप नेत्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, त्यांच्याकडून युतीबाबत अधिकृत सांगण्यात आले नाही. स्थानिक पातळीवर देवगड, मालवणमध्ये दोन्ही पक्षात चांगली चर्चा व समन्वय दिसून येत आहे, तर निवडणूक फॉर्म्युल्याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी युती व्हावी अशी शिवसेनेची अपेक्षा आहे, असे राऊत म्हणाले.बॉक्स - खड्डेमय महामार्ग आघाडी सरकारचे पापराऊत म्हणाले, गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी सर्वच खड्डे बुजविण्यात यश आले नाही. गेल्या आठ वर्षांत महामार्गासाठी एकाही रुपयाचा निधी न मिळाल्याने ही दुरवस्था झाली असून हे आघाडी सरकारचे पाप आहे. यावर्षी जास्तीचा पाऊस तसेच ३० टन पेक्षा अधिक होणारी दिवसरात्र अवजड वाहतूक रस्त्याची चाळण बनण्यास कारणीभूत आहे, तर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून मोबदला देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आले. वागदे व कुडाळ येथील काही भाग वगळता अन्य गावांतील मोबदला सर्वेक्षण प्रस्ताव लवकरच शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहे.साहित्य वाटपासाठी केंद्र्रीय मंत्री येणारमालवणसह जिल्ह्याभरात अपंगांच्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला होता. यातील लाभार्थी अपंग बांधवांचे साहित्यही प्राप्त झाले आहे. केंद्र्रीय मंत्री गेहलोत यांनी साहित्य वितरणासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्री गेहलोत जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.मालवण विकास आराखड्याला स्थगितीमालवण शहराचा विकास आराखडा नागरिकांना उद्ध्वस्त करणारा आहे. विशिष्ट बिल्डर लॉबीसाठी हा आराखडा फायदेशीर व सामान्य नागरिकांवर अन्यायकारक असा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री स्तरावरून आराखड्याला स्थगिती दिली असून, अन्यायकारक आराखडा रद्द होणार आहे.