शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारी कामात अधिकाऱ्यांचाच अडथळा, तांबोळी-डेगवे रस्त्यासाठी वनविभागाचा आडमुठेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:48 IST

सरकारी खात्याचाच जर सरकारी कामाला विरोध असेल, तर सामान्यजनांनी न्याय कुणाकडे मागायचा? अशा शासनाचा निषेध करीत अखेरीस तांबोळीवासीयांनी बरीच वर्षे रखडलेल्या तांबोळी-डेगवे या सुमारे दीडशे मीटर रस्त्याची श्रमदानातून दुरूस्ती केली.

ठळक मुद्देसामान्य जनतेला न्याय कोण देणार वनविभागाचे आडमुठेपणाचे धोरण तांबोळी-डेगवे रस्त्याची श्रमदानातून दुरूस्ती

महेश चव्हाण 

ओटवणे : सरकारी खात्याचाच जर सरकारी कामाला विरोध असेल, तर सामान्यजनांनी न्याय कुणाकडे मागायचा? अशा शासनाचा निषेध करीत अखेरीस तांबोळीवासीयांनी बरीच वर्षे रखडलेल्या तांबोळी-डेगवे या सुमारे दीडशे मीटर रस्त्याची श्रमदानातून दुरूस्ती केली. निधी उपलब्ध असूनही वनविभागाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे डांबरीकरणाचे कामकाज रखडल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला तांबोळी-डेगवे हा तब्बल पाच किलोमीटरचा रस्ता २०१४ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मार्गी लागला. त्यासाठी तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला.

तांबोळी, घारपी, असनिये, फुकेरी, भालावल, कोनशी ही गावे या मार्गामुळे बांदा बाजारपेठेशी कमी अंतरात जोडली जाणार होती. त्याचबरोबर डेगवे, मोरगाव तसेच दोडामार्ग तालुक्यातील बºयाच गावांशी ओटवणे दशक्रोशीतील गावांचा थेट जवळचा संबंध साधणार होता.

त्यासाठी माजी सभापती प्रमोद कामत यांनी तत्कालिन खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधत ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळवून दिला.

पण वनखात्याच्या हरकतीच्या धोरणामुळे उर्वरित राहिलेला काही लाखांचा निधी उपलब्ध असूनसुद्धा मिळत नसल्याचे दुर्भाग्य ग्रामस्थ व बांधकाम विभागाच्या पदरी पडले आहे.

या मार्गावरून दैनंदिन रहदारी सुरू आहे. पण मधील १५० मीटर रस्त्याचा भाग वनविभागाचा असल्याने त्यावर डांबरीकरण न करण्याची हरकत संबंधित विभागाने घेतल्याने तेवढ्याच रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण पूर्णत्वास गेले. पण वनखात्याच्या हद्दीतील हा रस्ता खड्ड्यांनी ग्रासला आहे.

रस्ता खराब झाल्याने एसटी महामंडळ परिवहनासाठी परवानगी देत नाही आणि रस्ता डांबरीकरणासाठी वनखाते बांधकाम विभागाला परवानगी देत नाही. त्यामुळे शासनाच्याच शासनाला होणाऱ्या विरोधात जनतेची मात्र मध्येच पिळवणूक केली जात आहे.

ज्या उद्देशाने कोट्यवधीचा निधी खर्ची घालून दुर्गम गावे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात होता. तो उद्देश सध्या तरी पूर्णत: फसला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून यासाठी स्थानिक ग्रामस्थ प्रयत्नशील असून शासन दरबारी येरझाऱ्या सुरू आहेत. आमसभेतसुध्दा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे हा प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र, आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडले नाही.

अखेरीस ग्रामस्थांनी स्वत: रस्त्यावर उतरत या १५० मीटर रस्त्याची जांभा दगड घालून, चर-खड्डे बुजवून श्रमदानातून दुरूस्ती केली. या मार्गाच्या संदर्भात लवकरच पुन्हा वनखात्याच्या अधिकाºयांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असल्याचे सरपंच अभिलाष देसाई व ग्रामस्थांनी सांगितले.

संबंधित रस्ता हा जवळपास १८ व्या शतकातील आहे. सन १९७७-७८ मध्ये रोजगार हमी योजनेतून या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. त्यावेळी हा रस्ता खासगी जमिनीत येत होता. मात्र, सन १९८१-८२ मध्ये ३५ सेक्शनाअंतर्गत तो अतिरिक्त ठरल्याने वनखात्याच्या ताब्यात गेला व त्याला वाघ संरक्षित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले.

पाच लाखांचा निधी पडूनया मार्गाचे कोट्यवधी रुपयांचे डांबरीकरण पूर्ण झाले. तरी १५० मीटरच्या रखडलेल्या कामकाजासाठी पाच लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. वर्षानुवर्षे हा प्रश्न रेंगाळत राहिल्यास निधी परत जाण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.

तांबोळी हा गाव इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. त्या अनुषंगाने संबंधित खात्याचे नियम-अटी आम्ही पाळतो. वनखात्याच्या सर्व कामकाजात गावच्या जनतेचा सहभाग आहे. असे असूनसुध्दा जर वनखाते आडमुठे धोरण अवलंबित असेल, तर त्यांच्या हद्दीत जाताना त्यांनी त्यांचा रस्ताच वापरावा आणि वनखात्याकडून ग्रामस्थांवर झालेला एकही अन्याय, मग तो वन्यप्राण्यांकडून असो किंवा अन्य कारणाने असो खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. वनखात्याने सहकार्याची भूमिका घ्यावी हीच अपेक्षा आहे.- अभिलाष देसाईनवनिर्वाचित सरपंच,तांबोळी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग