शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लेप्टो रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय मदत पथक

By admin | Updated: June 30, 2015 21:50 IST

दोन्ही ठिकाणी खास माहिती, सहकार्य व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत,

सिंधुदुर्गनगरी : जुलै ते नोंव्हेबर या कालावधीत संशयित लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव होत असतो. या कालावधीत काही गंभीर स्वरुपाच्या लेप्टो व संशयित रुग्णांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय मदत पथक लेप्टो उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर व वैद्यकीय महाविद्यालय, बांबुळी गोवा येथे संदर्भित करावे लागते. या दोन्ही ठिकाणी खास माहिती, सहकार्य व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मंगळवारी प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली.कोल्हापूर येथील कक्षात ए. जी. जोशी (कुष्ठरोग तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी कासार्डे), व्ही. व्ही . घुगरदरे (आरोग्य सहाय्यिका प्राथमिक केंद्र वैभववाडी), पी. के. पाटील (आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्यकेंद्र खारेपाटण) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोवा बांबुळी येथे जी. एस. भणगे (आरोग्यसेवक उपकेंद्र ओवळीये, प्राथमिक आरोग्यकेंद्र आंबोली), एम. एम. करमळकर (आरोग्य सहाय्यक प्राथमिक केंद्र गोळवण), ए. जी. गवस (आरोग्यसेवक दोडामार्ग) यांची नेमणूक करण्यात आली आहे.प्राथमिक केंद्र मदत, कक्षाचे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालयामधून रुग्णास कोल्हापूर किंवा गोवा येथे संदर्भित करताना त्या विषयाची सर्व माहिती त्वरित साथरोग नियंत्रण कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे दूरध्वनीद्वारे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा रुग्ण संदर्भित करण्यात येत आहे त्या रुग्णालयास तातडीने अवगत करण्याची जबाबदारी संबंधित आरोग्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी यांची राहील. जे रुग्ण उपचारासाठी दाखल होतील अशा रुग्णांशी तातडीने समक्ष संपर्क साधून त्यांचेशी चर्चा करुन आवश्यक ते सहकार्य करावे. उपचारासाठी जे रुग्ण दाखल होतील किंवा उपचाराअंती घरी रवाना होतील अशा प्रत्येक रुग्णांची माहिती त्वरित जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग किंवा डॉ. नामदेव सोडल (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. संजय काळे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. पी. पी. सवदी (जिल्हा साथरोगतज्ज्ञ) यांच्याकडे संबंधित कक्षातील कर्मचाऱ्यांनी तातडीने द्यावयाची आहे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)