शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शासनाने नेमली समिती, मंत्री नितेश राणेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:46 IST

'बाळासाहेब ठाकरे विकले गेले नव्हते'

कणकवली : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या समितीचे सहअध्यक्ष म्हणून महसूल मंत्री, वनमंत्री आणि मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मी स्वतः या समितीचा सदस्य आहे. अनधिकृत बांधकामे हटवायला गेले की लोक जमा होतात. अनेक वेळा अशा ठिकाणी हत्यारेही सापडली आहेत.ते पुढे म्हणाले, उद्यापासून या दिशेने कारवाई सुरू होईल. आमच्या समितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या विषयावर तडजोड न करणारे लोक आहेत”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे विकले गेले नव्हतेमंत्री राणे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “मुंबईचा डीएनए हिंदुत्व आणि महादेव आहे. ‘आय लव्ह पाकिस्तान’ बोलणारे येथे चालणार नाहीत. महादेवावर प्रेम करणारी आणि त्यांच्या विचारांवर चालणारी व्यक्तीच मुंबईची महापौर होईल. आम्हाला मुंबईत घाण ठेवायची नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मुंबई वाचवली. ते विकले गेले नाहीत”, असेही राणे म्हणाले.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचारमाजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी केलेल्या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी समाचार घेतला. ऑपरेशन सिंदूर राबविले गेले तेव्हा पहिल्या अर्ध्या तासातच भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आपल्या वायुदलाची विमाने उडाली नाहीत. जर कुठल्याही सीमेवर आपली विमाने उडाली असती तर पाकिस्तानने ती पाडली असती, असे वादग्रस्त वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. याबाबत मंत्री राणे म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांना सांगा, विषय निघून गेलेला आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणारा पक्ष आहे, यात नवीन काही नाही. पाकिस्तानचे हिरवे झेंडे मिरवणुकीत फिरवले जात होते, हे आम्ही विसरलेलो नाही’, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Committee Formed to Remove Encroachments on Forts: Minister Nitesh Rane

Web Summary : Maharashtra government forms committee, headed by the Cultural Minister, to remove encroachments on forts. Revenue, Forest, and Fisheries Ministers are co-chairs. Minister Rane, a member, emphasized strict action against illegal constructions, asserting no compromise on Shivaji Maharaj's legacy and Hindutva.