शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्र जोडून स्विमिंगचा ठेका मिळवला - निशांत तोरसकर

By अनंत खं.जाधव | Updated: May 9, 2023 18:46 IST

सावंतवाडीत स्विमिंग पूलमध्ये युवकाचा मृत्यू, मुख्याधिका-यांसह दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये झालेल्या युवकाच्या मृत्यूस नगरपरिषद चे मुख्य अधिकारीच जबाबदार आहेत. संबंधित ठेका घेणारा ठेकेदार हा प्रशिक्षित नसताना तसेच कागदपत्रा मध्ये तफावत असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांनी त्या संस्थेला ठेका दिला कसा असा सवाल सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी केला आहे.जर एखादा प्रशिक्षित व्यक्ती असता तर ग्लेन डिसोजा ला आपला प्राण गमवावा लागला नसता असा दावा तोरसकर यांनी केला आहे.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.तोरसकर म्हणाले,सावंतवाडी नगर पालिकेच्या माध्यमातून स्विमिंग पूलचा ठेका सावंतवाडीतील नेवगी नामक तरूणाला देण्यात आला होता. हा ठेका देत असतना  ठेकेदाराने बनावट कागदपत्रे जोडून हा ठेका घेतला आहे आज ही कागदपत्र ऑनलाइन उपलब्ध आहेत.याबाबत मी स्वता मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते पण त्या तक्रारीची साधे स्पष्टीकरण अथवा चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे झालेल्या प्रकार हा मुख्याधिकारी याच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे असे उघडपणे दिसत आहे.त्यामुळे जर कोण सांगत असेल कि त्याला अस्थमा होता किवा अन्य आजार होते.हे सर्व खोटे असून ग्लेन यांचा मृत्यू हा बुडून झाला असे शवविच्छेदन अहवालात आले आहे.मग तुम्ही चुकीची माहिती का पसरवता आणि आतापर्यंत पोलीसांनी कुणाच्या दबावाखाली येऊन चौकशी थांबवली आहे.असा सवाल ही तोरसकर यांनी केला आहे.यात मुख्याधिकारी यांची चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे पण बनावट कागदपत्र जोडली त्यात ठेकेदार दोषी आहे.त्याशिवाय स्विमिंग साठी येणाऱ्या युवकाची पुरेशी काळजी घेण्यात आली नाही त्यामुळे ग्लेन चा मृत्यू झाला त्यामुळे या ठेकेदार आणि इतर प्रशिक्षण देणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी तोरसकर यांनी केली.ठेकेदाराने जी कागदपत्र जोडली आहेत ही कागदपत्र बोगस आहेत एका कृषी अधिकाऱ्याचा अनुभवाचा दाखला जोडला आहे तसेच एका रिसॉर्ट मध्ये असलेल्या स्विमिंग पूल मध्ये प्रशिक्षण दिल्याचा दाखला जोडला आहे हा सर्व प्रकार म्हणजे फसवणूक आहे त्यामुळे त्या कागदपत्राची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणी आम्ही आतापर्यंत पोलीस अधीक्षक यांना भेटलो असून त्यानी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी ही तोरसकर यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी