शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

गुंडांची ओळख माझ्यापेक्षा राणेंना जास्त, दीपक केसरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:49 IST

मी राज्यमंत्री असताना राणेंवर गुन्हा दाखल करू शकलो नाही, याची आठवण करून दिल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. आता मी माझी नक्कीच यंत्रणा वापरेन. माझ्यावर आरोप करता, पण गुंडांची ओळख मला कशी असणार? माझ्यापेक्षा ती जास्त राणेंना असणार, अशी टीका सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद केली.

ठळक मुद्देगुंडांची ओळख माझ्यापेक्षा राणेंना जास्त, दीपक केसरकर यांची टीकानीलेश पराडकरची चौकशी करू

सावंतवाडी : मी राज्यमंत्री असताना राणेंवर गुन्हा दाखल करू शकलो नाही, याची आठवण करून दिल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. आता मी माझी नक्कीच यंत्रणा वापरेन. माझ्यावर आरोप करता, पण गुंडांची ओळख मला कशी असणार? माझ्यापेक्षा ती जास्त राणेंना असणार, अशी टीका सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद केली.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, आमदार नितेश राणे फोडत असलेले विजयाचे फटाके त्यांना वाजवता येणार नाहीत. ते फटाके दिवाळीपर्यंत तसेच राहतील आणि नंतर ते मुलांना द्यावे लागतील, अशी टिकाही केसरकर यांनी केली.ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशा लोकांनी गुंडगिरीवर बोलणे योग्य नाही. राणेंच्या सोबत असलेल्या लोकांची चौकशी केल्यास खून आणि बलात्कारातील आरोपी दिसतील, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही पक्षासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही. निवडणूक काळात एखादी स्टेजवर आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे, याची माहिती आपल्याकडे नसते. त्यामुळे या प्रकरणाचा विरोधकांकडून बाऊ करण्यात आला, असा आरोप केसरकर यांनी केला.ते पुढे म्हणाले, विजयाची खात्री सांगत फटाके वाजवण्याची भाषा करणारे आमदार नितेश राणे यांचे फटाके तसेच गाडीत राहणार आहेत. त्यांनी ते दिवाळीला वापरावेत. काही झाले तरी निलेश राणे यांचा पराभव निश्चित आहे, असा त्यांनी दावा केला. मी गृहमंत्री असताना राणेंवर गुन्हे दाखल करू शकलो नाही, असे निलेश राणे यांचे म्हणणे असेल तर त्यांचे आवाहन मी निश्चितच स्वीकारेन. येणाऱ्या काळात त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करू.

राणे माझ्यावर गुंडगिरीचे आरोप करतात, मात्र त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी. निलेश पराडकर हा काही वर्षांपूर्वी राणेंसोबतच काम करत होता. मात्र, आता शिवसेनेत आल्यावर त्याची गुंडगिरी दिसायला लागली. राणेंनी आपल्यासोबत किती जणांना यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणले होते, त्याची यादी आमच्याजवळ आहे. ती योग्य वेळी जाहीर करू. मी पराडकर यांचे समर्थन करणार नाही. त्यांची निश्चित चौकशी केली जाईल. त्याबाबत मी अहवाल मागवला आहे, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर