शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

‘मगांरोहयो’ च्या कामांना चांगला प्रतिसाद

By admin | Updated: May 13, 2016 23:46 IST

साडेपंधरा कोटी रूपये खर्च : येत्या वर्षात साडेवीस कोटींचे उद्दिष्ट

सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सिंंधुदुर्गात १५ कोटी ३८ लाख रूपये विविध कामावर खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.या १५ कोटी ३८ लाख रूपयांमधील ११ कोटी ४ लाख एवढी रक्कम मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आली आहे. यावर्षीच्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला शासनाने २० कोटी ६० लाखांचे रोजगार उद्दीष्ट रोजगार हमी योजनेअंतर्गत निश्चित करून देण्यात आले आहे. सिंधुदुर्गात महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित झाल्यानंतर या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी शासनाने ठरवून दिलेले उद्दीष्ट येथील प्रशासन १२० टक्के पूर्ण करत आहे. गतवर्षी सिंधुदुर्गाला रोजगार हमी योजनेअंतर्गत ९ कोटी ५५ लाख रूपये व २ लाख ८८ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथील प्रशासनाने हे उद्दीष्ट तब्बल १९२ टक्के पूर्ण केले आहे. उद्दीष्टपूर्ती करताना १५ कोटी ३८ लाख कोटींची कामे व ४ लाख १७ हजार मनुष्य दिन भरले गेले आहेत. त्यात १२ कोटी ९८ लाखांची जिल्हापरीषद प्रशासनाने व २ कोटी ४७ लाख रूपये इतर यंत्रणांनी कामे केलेली आहेत, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी) रोहयोच्या कामात जिल्हा परिषद अव्वल४महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला तर जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेअंतर्गत १२ कोटी ९८ लाखाची कामे केलेली आहेत. तर इतर यंत्रणांनी २ कोटी ४५ लाखांची कामे केली. यावरून जिल्हा परिषद इतर यंत्रणेच्या तुलनेत रोजगार हमी योजनेच्या कामात अव्वल राहीली आहे. मजुरीपोटी मिळाले ११ कोटीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक मजूराला १८१ रूपये प्रतिदिन मजुरी दिली जाते. त्यात १० रूपयांनी वाढ करत ती १९१ रूपये करण्यात आली आहे. जिल्ह्यात १५ कोटी ३८ लाख एवढी रक्कम या योजनेवर खर्च करण्यात आली असून त्यापैकी मजुरीवर ११ कोटी ४ लाख तर उर्वरीत ३ कोटी ९८ लाख रूपये साहित्यावर खर्च करण्यात आले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील लाखो तरूणांना हाताला काम मिळत आहे.या वर्षी २० कोटी ६० लाखांचे उद्दीष्टशासनाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला रोजगार हमी योजनेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात २० कोटी ६० लाखांचे उद्दीष्ट दिले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात रस्ते, फळपिक योजना, सिंचन, विहिर, गांडूळखत, गोठ्यांचे बांधकाम, कुक्कुुटपालन आदी कामे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.