शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोमाता कामधेनूचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग

By admin | Updated: January 14, 2015 23:21 IST

माथूर : सावंतवाडीत शेतकऱ्यांना गोमातेचे फायदे

सावंतवाडी : गोमाता-कामधेनूचा सेंद्रिय शेती व औषधासाठी मोठा उपयोग होत आहे. देशी गाय पालन करून जीवनात रोगमुक्त होण्यासाठी सर्वांनी एकजूट साधण्याची गरज राजस्थानमधील एक शेतकरी एस. आर. माथूर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी गोमूत्र, गोवर यांचे फायदे सांगितले. येथील श्रीधर अपार्टमेंट येथे एस. आर. माथूर यांनी गोमातेचे फायदे विषद केले. यावेळी सिंधुुदुर्गचे अ‍ॅग्रॉनिकचे अध्यक्ष बाबासाहेब परूळेकर, रामानंद शिरोडकर, रणजित सावंत, बाजीराव झेंडे, सचिन दळवी, आबा गवस, पंढरी राऊळ, रमाकांत मल्हार, धर्माजी गावडे, रमाकांत सातार्डेकर, लक्ष्मण परब, काका भिसे, सुबोध कारिवडेकर, अभिमन्यू लोंढे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी माथूर म्हणाले, देशी गायीचे दूध मानवासाठी अमृत आहे, तर गोमुत्र, गोबराला शेती व माणसाच्या जीवनात फार महत्त्व आहे. गोमुत्रापासून विविध रोगांवर औषधे बनविली जातात. तसेच सेंद्रिय शेतीलाही गोमूत्राचे अनेक फायदे होतात. त्यामुळे गोमाता सर्वांसाठी खरी कामधेनू आहे. गायीच्या गोवरापासून गॅस, वीजनिर्मितीही होते. त्यामुळे गोमूत्र, गोवराला मोठी मागणी आहे, असे सांगितले. देशी गाय जंगलात चरण्यासाठी गेली असताना ती उघड्या वातावरणात फिरते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियाचा फायदा गोमूत्र, गोबऱ्यातून किं वा दूध पिल्याने मानव व सेेंद्रिय शेतीला होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब परूळेकर म्हणाले, कॅन्सरला गायीचा पहिला चीक फायद्याचा ठरतो. चीक, गोमूत्र, गोबर आदी औषध फवारणी करणारी कंपनी विकत घेण्यास तयार आहेत. देशी गायीचे अनेक फायदे उठविण्यासाठी सर्वांनीच चळवळ उभी करून विषमुक्त शेतीला प्राधान्य देऊया, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रामानंद शिरोडकर, सचिन दळवी, बाजीराव झेंडे यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेती चळवळ उभारण्याचा सर्वांनीच विचार मांडला. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देताना शेतकऱ्यांची एकजूट व चळवळ उभारण्याचे आवाहन परूळेकर यांनी केले. यावेळी रणजित सावंत, काका भिसे, सुबोध कारिवडेकर, रमाकांत मल्हार, लक्ष्मण परब, आबा गवस, धर्माजी गावडे, आदींनी विचार मांडले. (वार्ताहर)