शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:19 IST

Nitin Gadkari Sindhudurgnews- आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केली.

ठळक मुद्देआत्मनिर्भर भारत बनण्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय नितीन गडकरी यांची घोषणा : क्लस्टर प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन

वेंगुर्ला : आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केली.केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ५० क्लस्टर प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील कल्पतरू क्वायर औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश होता. दरम्यान, हा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम महिला औद्योगिक सहकारी संस्था कॅम्प वेंगुर्ला येथील सभागृहात झाला.

देशात १८ राज्यांत एकाच वेळी स्फूर्ती अंतर्गत ५० क्लस्टरची सुरुवात झाल्याने या व्यवसायाशी निगडित ४२ हजार कारागिरांना रोजगार मिळणार असून त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरुवात होणार आहे. देश विकसित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न असून त्यासाठी गाव समृद्ध, संपन्न व शक्तिशाली होणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन तसेच काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक एम. के. गावडे, महिला काथ्या संचालिका प्रज्ञा परब, उपप्रादेशिक क्वायर बोर्ड अधिकारी श्रीनिवासन, विष्णू, नीलम क्वायर औद्योगिक संस्थेच्या गीता परब, सनराइझ क्वायर औद्योगिक संस्थेच्या श्रुती रेडकर, राखी करंगुटकर, वर्षा मडगावकर, सुजाता देसाई, अश्विनी पाटील यांच्यासहित मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.एमएसएमईच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना उभारी मिळत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व एमएसएमई विभागाचे सर्व अधिकार यांचे एम. के. गावडे यांनी आभार व्यक्त केले.कारागिरांनी एकत्र यावेउत्कृष्ट कारागीर व हस्तकला अवगत असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत प्रत्येक मतदारसंघात दहा क्लस्टर निर्माण करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मागणीनुसार उत्कृष्ट मालाची निर्मिती करणे गरजेचे आहे. गाईच्या शेणापासून उत्पादित केलेल्या रंगाला जगात मागणी असून देशात प्रत्येक गावात रंगाची फॅक्टरी सुरू करणे आपले ध्येय असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीsindhudurgसिंधुदुर्ग