शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील जनतेला टोलमुक्ती द्या!, टोल मुक्त समितीची मंत्री दीपक केसरकरांकडे मागणी

By सुधीर राणे | Updated: January 21, 2023 17:16 IST

तालुक्यातील नागरिकांना मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नाही

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ साठी ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोल आकारणी लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या नियोजित पथकर आकारणीतून सिंधुदुर्गवासीयांना मुक्ती मिळावी, अशी जिल्ह्यातील जनतेची भावना आहे. तसेच कणकवली गडनदी पुलानजीकचे धोकादायक वळणाबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीच्यावतीने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली. सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीच्या सदस्यांनी मंत्री केसरकर यांची कसाल येथील सिद्धिविनायक मंदिर येथे शुक्रवारी भेट घेतली. यावेळी द्वारकानाथ घुर्ये, संजय भोगटे, नितीन वाळके, राजन नाईक, नितीन म्हापणकर, अवधूत मालणकर, विनायक मेस्त्री आदी उपस्थित होते. मंत्री केसरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामार्ग  टोलमुक्त असेल, असे संबंधितांकडून यापूर्वी जाहीरही करण्यात आले होते. तरीही टोलच्या माध्यमातून महामार्ग  बांधणीचा खर्च वसूल करण्यास आमची कोणतीच हरकत नाही. मात्र, या सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची जागा आणि जिल्ह्याचा नकाशा लक्षात घेतला, तर जिल्ह्याच्या उत्तर भागातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यातील नागरिकांना मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नाही. साहजिकच त्यांना टोलच्या माध्यमातून भुर्दंड पडणार आहे. शासनानेच दिलेल्या शब्दानुसार जिल्हावासीयांना टोलमाफी मिळावी. सिंधुदुर्गचे सुपुत्र या नात्याने आपण टोलमाफीसाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, असेही म्हटले आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत हळवल फाटा येथील धोकादायक वळणाबाबतही चर्चा करण्यात आली. त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. वरील प्रश्नांबाबत मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितल्याची माहिती नितीन म्हापणकर यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाकाDeepak Kesarkarदीपक केसरकर