शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

सुरक्षा रक्षकांना न्याय द्या, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडविणार, बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:20 IST

सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने येथे देण्यात आला.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षक एकता समितीचा इशाराबांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन

सावंतवाडी : सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने येथे देण्यात आला.दरम्यान, आमचे पगार थकवून शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असाही सवालही यावेळी संतप्त सुरक्षा रक्षकांनी केला. आम्हांला न्याय हवा आहे. आमच्या मागण्या मान्य करा, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्या माध्यमातून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विजय गुरव, उपाध्यक्ष विद्याधर रेडकर, सचिव संजय देऊलकर, सदस्य भूषण परब, नितीन कांबळे, उमेश वाडकर, अनिल सावंत, संजय गावडे, संदेश नारकर, जगन्नाथ केळुसकर, अमित घाडी, तुकाराम सावंत, अभय आईर उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष विजय गुरव म्हणाले, सुरक्षा रक्षकांना न्याय दिला पाहिजे. सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू. सुरक्षा रक्षकांना पगार द्या. गरीब कामगारांचा पगार थकवून काय मिळणार? अशी विचारणाही गुरव यांनी केली. तसेच आम्हांला न्याय दिला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी गुरव यांनी दिला. बांधकामच्या कार्यालयीन सचिव यांच्याकडे निवेदन दिले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग