शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कासार्डेजवळ अपघातात मुलीसह आईवडील जागीच ठार

By admin | Updated: September 5, 2014 23:27 IST

खासगी आरामबस-कारची समोरासमोर धडक : भरणीतील पाडावे कुटुंबावर काळाचा घाला; कारचा चक्काचूर

नांदगाव, तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडीनजीक आज, शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास व्हॅगनर कार व खासगी आरामबस यांच्यात समोरासमोर धडक होऊन कणकवली तालुक्यातील भरणी येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. गणेश पाडावे (वय ३८, मूळ गाव भरणी, ता. कणकवली, सध्या रा. जोगेश्वरी), पत्नी सायली पाडावे (३५) व मुलगी वेदश्री पाडावे (११) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की, व्हॅगनर गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भरणी येथून मुंबईकडे व्हॅगनर कार (एमएच ०२ बीजी ७४०६) गणेश शामसुंदर पाडावे, तर मुंबईकडून कणकवलीकडे खासगी आरामबस (एमएच ०४ पीके ७५५६) सचिन विष्णू माने (रा. सातारा) हे घेऊन जात होते. त्यांच्यात महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणदेव जवळील मेढादेव या ठिकाणच्या वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर व्हॅगनरमधील सायली पाडावे या बाहेर फेकल्या गेल्याने त्यांना जोरात मार बसला, तर गणेश पाडावे व वेदश्री पाडावे गाडीतच अडकून / ाडल्याने जागीच मृत झाले. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने कासार्डे, तळेरे व नांदगावच्या ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर महामार्गावर सुमारे दीड तास एकेरी वाहतूक सुरू होती. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. व्हॅगनर गाडी पूर्णपणे तोडून अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रोहन रानमाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, कासार्डेचे आत्माराम गोसावी, चंद्रकांत झोरे, विजय खरात, तसेच आमदार प्रमोद जठार, पंचायत समितीचे सदस्य संजय देसाई, कासार्डेचे सरपंच संतोष पारकर, रज्जाक बटवाले यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ मदत केली. याठिकाणी सिंधुभूमी फाऊंडेशन कासार्डे, बाळा वळंजू मित्रमंडळ वारगाव, नांदगाव व फणसगाव येथील रुग्णवाहिका तात्काळ आल्या. (वार्ताहर)...तर त्या वाचल्या असत्याव्हॅगनरमधून बाहेर फेकल्या गेलेल्या सायली पाडावे यांना तत्काळ इमर्जन्सी १०८ रुग्णवाहिकेची मदत मिळाली असती, तर त्या कदाचित वाचल्या असत्या, असे उपस्थितांमधून बोलले जात होते. मात्र, १०८ ही रुग्णवाहिका इतर ठिकाणी गेल्याने तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.कुटुंबच उद्ध्वस्त झालेकणकवली तालुक्यातील भरणी (घाडीवाडी) येथील पाडावे हे कामानिमित्त जोगेश्वरी येथे राहायला होते. काल, गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करून आज पुन्हा मुंबईला जायला निघाले असता कासार्डे येथे त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि पाडावे कुटुंबच उद्ध्वस्त झाले. त्यांच्या पश्चात आई व भाऊ आहे.