शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत गायत्री झाट्येला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:45 IST

कणकवली : बृहन मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत मालवण येथील जय गणेश ...

ठळक मुद्देहोमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत गायत्री झाट्येला सुवर्णपदककुडाळ हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव कामतला कास्य पदक

कणकवली : बृहन मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत मालवण येथील जय गणेश हायस्कूलची सहावीतील विद्यार्थिनी गायत्री अमोल झाट्ये हीने सुवर्णपदक मिळविले आहे. तर कुडाळ हायस्कूलचा नववीतील विद्यार्थी प्रणव रघुनाथ कामत हा कास्य पदकाचा मानकरी ठरला आहे.महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या स्पर्धेतील सर्व टप्पे तिने कणकवली येथील युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार करत हे यश मिळविले आहे.लेखी ,प्रात्यक्षिक ,प्रकल्प व मुलाखत या चार टप्प्यात सहावी व नववीतील विद्यार्थ्यांकरता ही स्पर्धा घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील ६४९८२ विद्यार्थी या स्पर्धे अंतर्गत लेखी परीक्षेत सहभागी झाले होते. लेखी परीक्षेतून साडेसात टक्के विद्यार्थी प्रात्यक्षिकासाठी पुणे येथे निवडण्यात आले होते. प्रात्यक्षिक परीक्षेतून १० टक्के विद्यार्थ्यांची प्रकल्प व मुलाखतीसाठी मुंबई येथे निवड झाली.'प्रवाळ संवर्धन व संरक्षण ' हा विषय गायत्रीने प्रकल्पासाठी निवडला होता. मालवण शहरातील प्रवाळाचे महत्त्व विषद करत तिने समुद्र प्रवाळ हा केवळ सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने नव्हे तर समग्र सृष्टीच्या दृष्टीने अमूल्य असा ठेवा आहे.

प्रवाळ टिकले तर मासेमारी, पर्यटन टिकेल . त्यावरच मालवण शहराच्या आर्थिक सुबत्तेला चालना मिळेल . याचा विचार करून प्रवाळ संवर्धनासाठी व जतनासाठी कसे प्रयत्न व्हावेत, प्रवाळाचे पर्यावरणातील महत्त्व, माशांसाठी प्रवाळ कसे महत्त्वाचे आहेत ,मालवण पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होण्यास पाण्याखालची प्रवाळ कशी कारणीभूत ठरतील हे तिने आपल्या प्रकल्पातून मांडले आहे.प्रवाळ हे आपणास लाभलेली नैसर्गिक देणगी आहे . प्रवाळ पाहण्याचा आनंद घ्या आणि त्यांनाही छान पैकी जगू द्या असा संदेश देत तिने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज ,संत राऊळ कॉलेज, स.का पाटील कॉलेज , विविध शाळा तसेच डॉ. अहमद अफरोज यांच्यासमोर सादरीकरण करून जनजागृती केली.आपल्या या प्रकल्पाचे होमी भाभा रिसर्च सेंटर, टी आय एफ आर व इतर नामांकित इन्स्टिट्यूटच्या तज्ञ शास्त्रज्ञांसमोर उत्कृष्ट सादरीकरण करून सुवर्णपदक पटकावले. हा प्रकल्प करत असताना सारंग कुलकर्णी, युएनडीपीचे रोहित सावंत या तज्ञांची मुलाखत घेण्याची संधी तिला लाभली.या प्रकल्पासाठी युरेका सायन्स क्लबच्या मार्गदर्शनाबरोबरच सिंधुदुर्ग वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन कमिटीचे संदीप राणे, डॉ. गावडे ,सचिन देसाई, डॉ. कोळी , खान यांचेही बहुमोल सहकार्य मिळाले. तसेच आई-बाबा, शाळेतील शिक्षक यांचाही या यशात मोठा मोलाचा वाटा आहे. असे मनोगत गायत्रीने या यशानंतर व्यक्त केले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग