शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सीआरझेड बाधित वस्त्यांना गावठाणचा दर्जा

By admin | Updated: December 17, 2015 23:08 IST

माधव भांडारी : मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली लवकरच कार्यान्वित

मालवण : देवबाग, तारकर्ली आणि वायरी या तीन गावांना सीआरझेडच्या जाचक अटींमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सीआरझेडमुळे येथील जुन्या घरांची दुरुस्ती करणे स्थानिकांना मुश्किल बनले आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील सीआरझेड बाधित वस्त्यांचा सर्व्हे करून स्थानिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कोळीवाडा तसेच गावठाणचा दर्जा देण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली. दरम्यान, गोवा राज्याच्या धर्तीवर सीआरझेड कायद्यात शिथिलता आणण्यासाठी जानेवारी महिन्यात गोव्याचे खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावेकर यांना जिल्हा दौऱ्यावर आणून सीआरझेड वस्त्यांची पाहणी करून कायद्यात शिथिलता आणण्यासाठी शासनाकडे वस्त्यांचा अहवाल पाठविण्यात येईल. तसेच सीआरझेडमध्ये शिथिलता मिळण्यासाठी न्यायालयीन लढ्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे भांडारी यांनी स्पष्ट केले. मालवण येथील हॉटेल महाराजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी आमदार अजित गोगटे, माधवी नाईक, विलास हडकर, राजू राऊळ, महेश मांजरेकर, दादा वाघ, विजू केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, गजानन ठाकूर, अ‍ॅड. पूर्वा ठाकूर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)पारंपरिक मच्छिमारांना न्याय४भांडारी म्हणाले, सिंधुदुर्गात सततच्या होत असलेल्या पारंपरिक मच्छिमार आणि पर्ससीन यांच्यातील संघर्षाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांनी पारंपरिक मच्छिमारांना न्याय देण्यसाठी सरकारने तत्वत: स्विकारलेला डॉ. सोमवंशी अहवालाला हिवाळी अधिवेशनात मान्यता दिली आहे. ४अहवालातील कायद्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असे भांंडारी म्हणाले. तर अवैध मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी मालवणातील मच्छिमारांनी केलेल्या ड्रोन प्रणालीच्या मागणीला खडसे यांनी मान्यता दिली आहे. ड्रोनबाबत मत्स्य खात्याने तरतूद केली असून याबाबतचे आदेशही देण्यात आले आहेत. ड्रोनची कार्यवाही मार्च अखेरीस पूर्ण होईल, असेही भांडारी यांनी सांगितले. ‘तो’ आदेश मुख्यमंत्र्यांचा नव्हतादेवबाग येथील सुधाकर सामंत यांच्या अनधिकृत बांधकामावर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. बांधकाम तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आले होते अशी विरोधकांनी अफवा पसरविली होती. याबाबत भांडारी यांची पर्यटन व्यावसायिक व नागरिकांनी भेट घेतली. भांडारी यांनी मुख्यमंत्री स्तरावरून आदेश आला नव्हता असे स्पष्ट केले.