शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival : गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या, कणकवलीसह सावंतवाडीत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:47 IST

श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने कणकवलीसह सावंतवाडी शहरातील आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. सजावटीचे साहित्य, किराणा माल, फळबाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस्तूला महागाईची झळ बसल्याचीही चर्चा ग्राहकांत रंगली होती.

ठळक मुद्देगणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या, कणकवलीसह सावंतवाडीत गर्दी फळबाजार तेजीत, प्रत्येक वस्तूला महागाईची झळ

कणकवली : श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने कणकवलीसह सावंतवाडी शहरातील आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. सजावटीचे साहित्य, किराणा माल, फळबाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस्तूला महागाईची झळ बसल्याचीही चर्चा ग्राहकांत रंगली होती.बुधवारी हरितालिका व्रत असून याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हरितालिकेसाठी नारळाची शहाळी महत्त्वाची असल्याने किनारपट्टी भागातून तसेच केरळ, कर्नाटक येथून आलेल्या शहाळ्यांनी बाजारपेठ व्यापली होती. एका शहाळ्यासाठी चाळीस ते पन्नास रुपये दर लावला जात होता. काही ठिकाणी याहूनही चढे दर आकारले जात होते.

श्रावण महिन्यात वाढलेले फळांचे दरही चढेच राहिले आहेत. सफरचंद, मोसंबी, डाळिंब यांचे दर सरासरी शंभर ते दोनशे रुपये किलो एवढे होते. चांगली केळी पन्नास तर इतर केळी चाळीस रुपये डझनानेच घ्यावी लागत होती. तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी, वाटाणे, शेंगतेल, पामतेल तसेच विविध कडधान्ये आदींना मोठी मागणी आहे.श्री गणरायाच्या सजावटीसाठी कापड विक्रेत्यांनी विविध प्रकारचे पडदे उपलब्ध केले असून, त्यासाठीची चोखंदळ खरेदी ग्राहकांतून केली जात होती. याखेरीज विद्युत रोषणाईची दुकानेदेखील गर्दीने फुलली होती. समई, पंचारती यांचा समावेश असलेली भांड्याची दुकाने, विविध प्रकारच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी होती.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या संख्येने मुंबईहून चाकरमानी दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी रेल्वे प्रशासनाने जादा रेल्वेगाड्या सोडल्याने प्रवाशांची सोय झाली. गेल्या दोन दिवसांत हजारो चाकरमानी जिल्ह्यात आल्याने येथील बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायही तेजीत आहे. दरम्यान, शहरवासीयांपेक्षा ग्रामीण भागातून किराणा व इतर साहित्याला मागणी असल्याने या व्यावसायिकांची उलाढाल वाढली आहे.महागाईचा फटका, काटकसरीने तोडगादिवसेंदिवस महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेचा जीव अगदी मेताकुटीस आला आहे. पण आपल्या लाडक्या गणरायाच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असून काटकसरीने महागाईवर तोडगा काढला जात असल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळत आहे.याखेरीज आरती, भजनांसाठी लागणाऱ्या तबला-मृदुंग, ढोलकी अशा तालवाद्यांच्या दुकानांमध्ये काम हातावेगळे करण्यात स्थानिक कारागीर तसेच पंढरपूरहून पोटासाठी आलेली कुटुंबे दिवस-रात्र मेहनत घेताना दिसत आहेत. गणरायाच्या आरती आणि भजनानंतर दिल्या जाणाºया प्रसादासाठी सफरचंद, केळी, चिबूड, काकडी, पेढे, लाडू, मोदक आदींची खरेदी चाकरमान्यांकडून सुरू होती. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग