शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

Ganpati Festival -चिमुकल्या मेधांशने साकारला इक्रोफें्रडली गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:15 IST

लहानपणी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे प्रसंग अनेकदा येऊन जातात. योग्यवेळी मुलांना पालकांनी दाद दिली की मुलांच्या कलेला आणि प्रतिभेला पंख फुटतात. एक विस्मयजनक कलाकृतीची निर्मिती होते. असेच काहिसे घडले आहे नाधवडे चारवाडी येथील पाच वर्षाच्या मेधांश सतीश मदभावे याच्या बाबतीत.

ठळक मुद्देवर्तमानपत्रांच्या कागदांचा लगदा, मातीचा वापरमूर्तिकार उदय दुधवडकर यांचे मार्गदर्शन

निकेत पावसकर तळेरे : लहानपणी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे प्रसंग अनेकदा येऊन जातात. योग्यवेळी मुलांना पालकांनी दाद दिली की मुलांच्या कलेला आणि प्रतिभेला पंख फुटतात. एक विस्मयजनक कलाकृतीची निर्मिती होते. असेच काहिसे घडले आहे नाधवडे चारवाडी येथील पाच वर्षाच्या मेधांश सतीश मदभावे याच्या बाबतीत.याबाबत माहिती देताना मेधांशची आई बाबा सांगतात, तळेरे येथील ह्यबलोपासनाह्ण या संस्कार वर्गात मातीचा नागोबा करण्यास येऊ लागल्यावर आपल्याला गणपती बनवायचा आहे असा अट्टाहास मेधांश याने केला. मग आम्हीही मेधांशची इच्छा मनावर घेतली आणि मेधांशचे आजोबा मूर्तीकार उदय दुदवडकर यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार मेधांश याने वर्तमानपत्रांच्या कागदांचा लगदा व माती यांपासून सव्वा फूट उंचीची निसर्गमैत्र (इकोफ्रेंडली) गणेशमूर्ती साकारली आहे.अलिकडे मुलांना मोबाईलवरील खेळ सर्वाधिक आवडतात. मात्र, मेधांश याला त्यासोबतच चित्रकला, हस्तकला, मूर्तिकला, कॉम्प्युटरवरील खेळ यांची आवड आहे. तळेरे येथील बलोपासना या संस्कार वर्गात इतर मुलांसहित मेधांश याला चित्रकलेबरोबर मूर्ती कलेचे मार्गदर्शन संस्कार वर्गाचे प्रणेते मूर्तिकार ज्योतिष्याचार्य उदय दुदवडकर यांच्याकडून मिळाले.

मेधांश यांच्यां शेजारी नाधवडेतील सुनील मेस्त्री यांची गणेश चित्रशाळा आहे. सुनील मेस्त्री गणपती करीत असताना त्यांच्या कामाचे निरीक्षण मेधांश करीत असे. मेधांश याने तयार केलेल्या मूर्तीसाठी सुनील मेस्त्री यांनी रंग व माती इत्यादी साहित्य पुरवून त्याच्या कलेला दाद दिली. मेधांशचे आजोबा चंद्रकांत मदभावे यांनीही मेधांश याला प्रोत्साहन दिले.कलाकृतीचे सर्वत्र कौतुकसुरुवातीला मेधांशने सहा छोट्या गणेशमूर्ती बनविल्या. या मूर्ती चढत्या क्रमाने मोठमोठ्या आकाराच्या बनविलेल्या होत्या. अखेर सातवी मूर्ती ही सव्वा फुट उंचीची बनवली व रंगवली. मेधांशला प्रोत्साहन म्हणून त्याने बनवलेली गणेश मूर्ती त्याचे आजोबा चंद्रकांत मदभावे यांनी गणेश चतुर्थीला पूजनासाठी घरी पूजनात ठेवली. मेधांशच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग