शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राधा कृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली मंडळ प्रथम, विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी 

By सुधीर राणे | Updated: April 8, 2024 17:31 IST

कणकवली : ज्येष्ठ व्यापारी सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने कणकवली झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधा कृष्ण नृत्य रोंबाट ...

कणकवली : ज्येष्ठ व्यापारी सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने कणकवली झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधा कृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी ठरले. या स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली-कुडाळ या मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्वर, राईचीवाडी या संघाने द्वितीय तर गजानन भजन मंडळ, नेरूर- कुडाळ संघाने तृतीय क्रमांक मिळवला.या स्पर्धेचा शुभारंभ मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश सापळे व वारकरी विलास बीडये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी,उपाध्यक्ष राजन पारकर, खजिनदार मंदार सापळे, निलेश धडाम,राजू मानकर, उदय मुंज,साई अंधारी, सौरभ पारकर, महेंद्र सांबरेकर मुकुंद खानोलकर, बाळा सापळे,काशिनाथ कसालकर आदी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले.स्पर्धेअंतर्गत 'खो..खो.. खेळ खेळती संवगडी..',' क्षण हा आनंदाचा.. सण हा होळीचा.. खेळ रंगला शिमग्याचा' अशा विविध गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी  चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांच्या अप्रतिम सादरीकरणाने नागरिक भारावून गेले. शिमगोत्सवानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित केलेली राधा कृष्ण रोंबाट स्पर्धा कणकवलीकरांसाठी अविस्मरणीय ठरली.राधा कृष्ण रोंबाट स्पर्धेत भव्य  चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्कारांचे एकापेक्षा एक सरस असे सादरीकरण करण्यात आले. गौळण व भारूडांवर या सर्व संघातील कलाकारांनी कलाविष्कराचे अप्रतिम सादरीकरण केले. बाजरपेठ, झेंडा चौकातील मांड उत्सवात हलत्या ट्रिकसीनयुक्त देखाव्यांसह कलाविष्करांचा सोहळा नेत्रदीपक ठरला. याशिवाय सोंगांचा कार्यक्रम उत्तरोतर रंगतदार ठरला. या स्पर्धेचे  बाळू वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग