शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शाही गणेशोत्सवाची सांगता-आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा ४२ दिवसांचा गणराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 22:13 IST

आचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये,

लोकमत न्यूज नेटवर्कआचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये, अशी काहीशी मनामध्ये घर करून राहिलेली भावना गुरुवारी सायंकाळी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवसांच्या गणेशमूर्तीला निरोप देताना आचरावासीयांनी अनुभवली. यावेळी असंख्य भाविकांची भावूक स्थिती झाली होती.हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी श्री देव रामेश्वर मंदिर ते आचरा-पिरावाडी समुद्रकिनारा अशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.जिल्ह्यात सर्वाधिक दिवस चालणारा गणेशोत्सव म्हणून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या सागंता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्येक्रम करण्यात आले. दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक समुद्रकिनारी सरकू लागली.@विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.मिरवणुकीत हिंदू बांधवांबरोबर गावातील मुस्लिम, ख्रिश्चन बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळांनी भाविकांना प्रसाद म्हणून मोदक वाटप केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीनेश्री गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर ‘जनसागरही’ उसळल्याचे चित्र होते.सहा तास मिरवणूकगणेश मिरवणूक रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडी, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे पिरावाडी येथील श्री देव चव्हाट्यावर आली. यावेळी गणेशमूर्र्ती काही वेळ ठेवण्यात आली होती. येथे मच्छिमार बांधवांनी गणरायाचे दर्शन घेतले. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत स्थानिक भाविक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते. ‘मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी आचरा गाव दुमदुमून गेला होता.