कुडाळ : सध्या शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील विजय कुडाळकर यांनी एक आदर्श पाऊल उचलले आहे. त्यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन पाच दिवसांनी गणपती विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्या टाकीमध्ये मोठ्या भक्तिभावपूर्ण विधीवत केले.सध्या सर्वत्र वाढणाऱ्या कोरोना आजाराचा फैलाव आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गणेश विसर्जनावेळी होत असलेली गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने गणपती विसर्जना बाबत अनेक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये घरगुती गणपतींचे शक्यतो कुत्रिम तलाव किंवा टाक्यांमध्ये विसर्जन करण्यात यावे असे आवाहनही केले होते.मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये घरगुती गणपतींचे कृत्रिमरीत्या बनविण्यात आलेल्या टाक्यांमध्ये किंवा तलावांमध्ये करण्यात येते. कोकणात मात्र समुद्र, नदी, ओहोळ यांमध्ये घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. अजूनही कोकणात विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्या टाक्यांमध्ये गणपतींचे विसर्जन केल्याचे शक्यतो दिसून येत नाही.कुडाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विजय कुडाळकर हे ही दरवर्षी त्यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन कुडाळ भंगसाळ नदीतील करतात. यावर्षी मात्र कुडाळकर यांनी शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाचा बाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी त्यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन पाच दिवसांनी घराजवळच गणपती विसर्जनासाठी टाकी ठेऊनमध्ये मोठ्या भक्तिभावपूर्ण विधीवत गणपतीचे विसर्जन केले.जलप्रदुषण कमी करण्याचा प्रयत्नयाबाबत विजय कुडाळकर यांनी सांगितले की, शासनाने गणपती विसर्जन बाबत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देता यावा, तसेच अशा प्रकारे गणपती विसर्जन करून जलप्रदुषण कमी करता यावे हाच त्यामागचा उद्देश आहे.
Ganesh Mahotsav - घरच्या टाकीमध्ये केले गणेश विसर्जन, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:39 IST
सध्या शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील विजय कुडाळकर यांनी एक आदर्श पाऊल उचलले आहे. त्यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन पाच दिवसांनी गणपती विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्या टाकीमध्ये मोठ्या भक्तिभावपूर्ण विधीवत केले.
Ganesh Mahotsav - घरच्या टाकीमध्ये केले गणेश विसर्जन, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद
ठळक मुद्दे घरच्या टाकीमध्ये केले गणेश विसर्जन, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद कुडाळ आंबेडकरनगर येथील युवकाचे आदर्श पाऊल